आदर्श विच्यारांचे शिक्षक जिवणात मिळाले तर माणूस संस्कारीत बनतो

आदर्श विच्यारांचे शिक्षक जिवणात मिळाले तर माणूस संस्कारीत बनतो

*कोकण Express*

*आदर्श विच्यारांचे शिक्षक जिवणात मिळाले तर माणूस संस्कारीत बनतो.*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*

कणकवली शहरातील सामाजिक कार्यकर्ते श्री सिताराम उर्फ दादा कुडतरकर यांनी आपल्या आईच्या कै . रमाबाई दत्तात्रय कुडतरर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेतील आदर्श शिक्षिका सौ . वृषाली जाधव यांचा सत्कार करण्यात आला . शिक्षणाविषयी अतिव जिव्हाळा असणारे कुडतरकर कुटुंबियांची तिसरी पिढी विद्या मंदिर प्रशालेत शिक्षण घेत आहे. शिक्षणामुळेच मानवाचा विकास होत असतो . त्यासाठी आदर्श विचारांचे आणि निष्ठेने सेवा करणारे शिक्षक जर जीवनात मिळाले तरच माणूस संस्कारित होत असतो . विद्यामंदिर शाळेने आदर्श शिक्षकांच्या रुपाने संस्कारित पिढी घडविण्याचे कार्य केले . सौ जाधव मॅडम यांनी आपल्या तिस वर्षाच्या सेवेत निष्काम कर्तव्य बजावून सुसंस्कारित विद्यार्थी घडविले . विनयशिल वृत्ती आणि प्रामाणिकपणा या भावनेने अध्यापन करून आदर्श विद्यार्थी घडविले . . म्हणूनच समाज जीवनामध्ये त्यांच्या कार्याचा ठसा उमटत असतो . आदरणीय दादा कुडतरकर कुटुंबियांनी विद्यामंदिर शाळेतील आदर्श हिरे शोधून त्यांच्या कर्तव्य भावनेची कदर केली आणि आदर्श शिक्षिका म्हणून सौ . जाधव मॅडम यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आदरणीय वळजूंसाहेब मुख्याध्यापक पीजे कांबळे सर्व शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!