*कोकण Express*
*तळेरे येथे नवरात्रौत्सवानिमित्त विविध कार्यक्रम*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
श्री शेवरा देवी कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तळेरे वाघाचीवाडी येथे दुर्गा देवीची स्थापना करण्यात येणार आहे आणि त्यानिमित्ताने दररोज सायंकाळी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
दररोज सायंकाळी साडेसात वाजता देवीची महाआरती, नऊ वाजता रास गरबा, दांडिया नृत्य, होणार आहे. तर या दरम्यान वेशभूषा स्पर्धा, फुगडी स्पर्धा अशा विविध कार्यक्रमाने कार्यक्रमांमध्ये रंगत येणार आहे. त्यानंतर दररोज मानाची पैठणी लकी ड्रॉ च्या माध्यमातून ठरणार आहे. त्याचप्रमाणे 22 ऑक्टोबर ला अष्टमी होम होणार आहे. दुपारी महाप्रसाद या कार्यक्रमासाठी वाढतील
विजया दशमीच्या दुसऱ्या दिवशी देवीचे विसर्जन करण्यात येते. हे सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व ग्रामस्थ, महिलावर्ग, तरुण वर्ग एकजुटीने मेहनत घेत असतात. मुंबईस्थित चाकरमानी यांचासुद्धा यामध्ये मोलाचे सहकार्य मिळते. तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन वाघाचीवाडी ग्रामस्थ आणि मुंबई ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात येत आहे.