*कोकण Express*
*गरीब गरजू नागरिकांसाठी 18 ऑक्टोंबर पासून मोफत भोजन थाळीचे समीर नलावडे मित्र मंडळाचे आयोजन*
*कणकवलीतील 100 ते 200 गरीब गरजूंना मोफत जेवण देण्याचा माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा उपक्रम*
*कणकवली ः प्रतिनिधी*
हातावर पोट असलेल्या रोजदारी वर्गासाठी कणकवलीकरांची थाळी हा सामाजिक बांधिलकी च्या जाणिवेतून नवीन उपक्रम सुरू करत असल्याचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले. दिवसाला किमान 100 आणि जास्तीत जास्त 200 गरजूना मोफत जेवण थाळी देण्यात येणार आहे. डाळ भात पुरी भाजी लोणचे असा मेनू असलेले जेवण गरजूंना आर बी बेकरी समोर पटवर्धन चौकात दुपारी 1 ते 3 या वेळेत देण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ 18 ऑक्टोबर रोजी होणार असून पहिल्या दिवसाचे भोजन राष्ट्रवादी कॉंग्रेस चे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्याकडून प्रायोजित करण्यात आले आहे वाढदिवस साजरा करणाऱ्या व्यक्तींकडून यासाठी आर्थिक सहाय्य घेण्यात येणार असून 200 थाळीसाठी 10 हजार व 100 थाळीसाठी 5 हजार खर्च होणार आहे. भोजन प्रयोजकाचा बॅनर मोफत भोजन थाळी ठिकाणी लावण्यात येणार आहे. याचे आयोजन समीर नलावडे मित्रमंडळ करणार आहे. भोजन देणगी साठी राजा पाटकर मोबा. 9860380738 राजू गव्हाणकर मोबा. 9422584900 पंकज पेडणेकर मोबा. 9890030289 याच्याशी संपर्क साधावा. यावेळी राजा पाटकर, राजू गव्हाणकर उपस्थित होते.