कासार्डे देऊळकर वाडी येथील शाळेच्या नुतन इमारतीचा भूमीपुजन सोहळा धडाक्यात संपन्न.

कासार्डे देऊळकर वाडी येथील शाळेच्या नुतन इमारतीचा भूमीपुजन सोहळा धडाक्यात संपन्न.

*कोकण Express*

*कासार्डे देऊळकर वाडी येथील शाळेच्या नुतन इमारतीचा भूमीपुजन सोहळा धडाक्यात संपन्न*

*कासार्डे प्रतीनीधी : संजय भोसले*

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासार्डे देऊलकरवाडी शाळेच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन व कोनशिला माजी जि.प. सदस्य संजय देसाई याच्या शुभहस्ते करण्यात आली. सदर इमारतीस आमदार नितेश राणे साहेब यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आली.

यावेळी माजी पंचायत समिती उपसभापती प्रकाश पारकर, माजी सरपंच संतोष पारकर, कासार्डे सरपंच सौ निशा नकाशे, उपसरपंच गणेश पाताडे, सोसायटी चेअरमन दीपक सावंत,खरेदी विक्री संघाचे संचालक श्रीपत पाताडे, जमीनदार सुभाष पाताडे,कासार्डे केंद्रप्रमुख संजय पवार ,ग्रामपंचायत सदस्य श्रद्धा शेलार,अभिजित धुमाळ, खरेदी विक्री संघाचे संचालक श्रीपत पाताडे,ग्रामविकास अधिकारी गजानन कोलते, ग्रामपंचायत सदस्य विजय राणे, कृ कंषं, सत्यवान आयरे,शरद आयरे,शरद शेलार, प्रकाश पवार, अशोक सकपाळ, देसाई काका,रणदिप गायकवाड, हेरंब चिके, दिपक गायकवाड, दत्ताराम शेलार, मुख्याध्यापक जगदिश गोसावी, जयवंत सकपाळ, संदेश सावंत, दत्तात्रय जाधव, बाळू सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

या इमारतीसाठी गेली १२ वर्षे मागणी असताना सतत पाठपुरावा केल्याने नवीन शाळा इमारती निधी मंजूर करण्यात आला असून ही इमारत दुमजली होणार आहे. जिल्हा वार्षिक कार्य योजनेतून तीन वर्गखोल्यांच्या इमारती साठी ३६ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. भुमिपुजन सोहळा जमिनदार सुभाष पाताडे यांच्या हस्ते कोणशिलेची पुजा करण्यात आली.यावेळी प्रकाश पारकर, संजय देसाई,सरपंच निशा नकाशे यांनी मनोगत व्यक्त केले तर सुत्रसंचलन सत्यवान आयरे यानी केले. कार्यक्रमाला ग्रामस्थ आणि महिला वर्ग मोठ्या संखेने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!