वेंगुर्ले आगाराच्या वेंगुर्ले बसस्थानक व शिरोडा बसस्थानकाची स्वच्छता कमिटीकडून तपासणी

वेंगुर्ले आगाराच्या वेंगुर्ले बसस्थानक व शिरोडा बसस्थानकाची स्वच्छता कमिटीकडून तपासणी

*कोकण Express*

*वेंगुर्ले आगाराच्या वेंगुर्ले बसस्थानक व शिरोडा बसस्थानकाची स्वच्छता कमिटीकडून तपासणी*

*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*

राज्यपरीवहन महामंडळामार्फत हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान स्पर्धे अंतर्गत वेंगुर्ले आगार व वेंगुर्ले बस स्थानक तपासणीस आलेले कोल्हापुर विभागाच्या पथकाचे वेंगुर्ले आगार व्यवस्थापक राहुल कुंभार यांनी वेंगुर्ले बसस्थानकावर स्वागत केले.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या माध्यमातून राज्यातील ३१ जिल्हयातील राज्य परीवहन महामंडळाची आगारे व बसस्थानके यांची तपासणी व्हावी. प वाश्यांना सेवा व सुविधा मिळतात कि नाही. याबरोबर आगार व बसस्थानकांत गाड्यासह परीसराची स्वच्छता रहाते कि नाही. याची दरवर्षी पहाणी व्हावी. व त्या दृष्टीने प्रवाश्यांना सोयी सुविधा कमतरता असलेल्या भागात त्या देण्याच्या उद्देशाने राज्यपरीवहन महामंडळामार्फत हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान स्पर्धात्मक स्वरूपात राबविण्यात येत आहे.
या स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान स्पर्धेत सहभाग असलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील वेंगुर्ले बस स्थानक व शिरोडा बस स्थानक या वेंगुर्ले आगाराच्या बस स्थानकाचे सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या कोल्हापूर विभागाच्या सर्वेक्षण समितीच्या प्रमुख कोल्हापूर विभाग नियंत्रक श्रीमती अनघा बारटक्के, उपयंत्र अभियंता श्रीमती सुकन्या मानकर, कामगार अधिकारी संदीप भोसले, विभागीय भांडार अधिकारी संग्राम शिंदे यांचे वेंगुर्ले बस स्थानकावर वेंगुर्ले आगार व्यवस्थापक राहुल कुंभार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी त्यांच्या समवेत वेंगुर्ले आगार व्यवस्थापक राहुल कुंभार, प्रवासी संघटना प्रतिनिधी राधाकृष्ण वेतुरकर, या समितीचे प्रतिनीधी दैनिक तरुण भारतचे पत्रकार भरत सातोस्कर, वाहतुक नियंत्रक सुनिल धामोळे, सहायक वाहतूक निरीक्षक लालसिंग पवार, आदी उपस्थित होते.
या स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान स्पर्धेत वर्षभरात वेंगुर्ले आगाराच्या अधिपत्याखाली येणाऱ्या वेंगुर्ले बस स्थानक व शिरोडा बस स्थानक या बस स्थानकातील परिसर, बसेस, वेंगुर्ले आगार परीसर, बस स्थानक स्वच्छतेबरोबरच पर्यावरण पूरक वसुंधरे बाबत केलेले काम, प्रवाशांसाठी केलेल्या सेवा सुविधा तसेच अन्य बाबी यांची पाहणी या समितीने प्रत्यक्ष विविध जागेवर जात केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!