*कोकण Express*
*निलेश मेस्त्री यांची कणकवली विधानसभा युवासेनाप्रमुख पदी नियुक्ती*
*जिल्हाध्यक्ष संजय आग्रे यांनी दिले नियुक्तीपत्र*
*कणकवली ः प्रतिनिधी*
शिवसेनेच्या कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघ युवासेना प्रमुखपदी निलेश संदेश मेस्त्री यांची नियुक्ती करण्यात आली असून जिल्हाप्रमुख संजय जागे यांच्या हस्ते निलेश यांना कणकवली येथील मध्यवर्ती संपर्क कार्यालयात नियुक्तीपत्र देण्यात आले. निलेश मेस्त्री यानी अलीकडेच मनसे ला जय महाराष्ट्र करून शिवसेनेत प्रवेश केला होता.. त्यानंतर पक्ष नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार निलेश मेस्त्री यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी कणकवली तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, कणकवली विधानसभा प्रमुख संदेश पटेल, कणकवली तालुका युवासेना अध्यक्ष निलेश तेली, चिन्मय रावराणे, सिद्धेश मोंडकर, दर्देश परब, भरत भालेकर, प्रतिक भिसे, दुर्वेश राणे आदी उपस्थित होते.