*कोकण Express*
*कणकवली -कळसुली मार्गावरील शालेय बस फेरी रद्द केल्यास अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही – आमदार नितेश राणे*
*आमदार नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना फोन केला आणि शालेय बस फेरीची समस्या तात्काळ लागली मार्गी *
*सरपंच सचिन पारधीये यांच्या पाठपुराव्याला यश*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली आगारातून सायंकाळी चार वाजता सुटणारी कणकवली -कळसुली शालेय बस फेरी अचानक रद्द करुन विद्यार्थ्यांची गैरसोय करु नये.तसेच कणकवली कळसुली मार्गावरील एसटी बसेस यापुढे नियमित वेळेवर सोडून प्रवाशांची गैरसोय दूर करा.यापुढे एसटी प्रशासनाने शालेय विद्यार्थ्यांची आणि प्रवाशांची गैरसोय केल्यास अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही.एसटी च्या अधिकाऱ्यांनी आपल्या कामात सुधारणा करावी.अन्यथा तुम्हाला शिस्तीचे धडे द्यावे लागतील.असा इशारा आमदार नितेश राणे यांनी कणकवली विभागीय कार्यालयातील एसटी च्या अधिकाऱ्यांना आज भ्रमणध्वनी वरुन दिला.त्यानंतर विभागीय वाहतूक अधिकारी यांनी कणकवली – कळसुली मार्गवरील सर्व एसटी बस फेऱ्या वेळेवर सोडून प्रवाशांची गैरसोय करणार नाही, असे आश्वासन आमदार नितेश राणे यांना दिले . आमदार नितेश राणे यांनी तातडीने लक्ष देत ही समस्या मार्गी लावल्याने कळसुली शिष्टमंडळाने आमदार नितेश राणे यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.*
*कणकवली आगारातून सायंकाळी चार वाजता सुटणारी कणकवली -कळसुली ही एसटीची बस फेरी मागील दोन दिवसांपासून अचानक पणे रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती.या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी अकरा वाजता कणकवली विभागीय कार्यालयात कळसुली गावच्या वतीने सरपंच सचिन पारधीये यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विभागीय वाहतूक अधिकारी यांची भेट घेतली.आणि त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करीत एसटी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा पाढा वाचला.आणि आमदार नितेश राणे यांना भ्रमणध्वनी वर फोन करुन एसटी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराची माहिती दिली.त्यानंतर आमदार राणे यांनी विभागीय वाहतूक अधिकारी विक्रम देशमुख यांना खडे बोल सुनावले.आणि शालेय बस फेरी यापुढे रद्द करुन विद्यार्थ्यांची गैरसोय केल्यास अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही.ढिसाळ कामकाजात सुधारणा करा, अन्यथा तुम्हाला शिस्तीचे धडे द्यावे लागतील.यापुढे अशी गैरसोय खपवून घेतली जाणार नाही.असा इशारा दिला.त्यानंतर अधिकाऱ्यांनी कणकवली कळसुली एसटी बस फेऱ्या रद्द केल्या जाणार नाहीत.नियमित वेळेवर बस सोडण्यात येतील.विद्यार्थी आणि प्रवाशांची गैरसोय होणार नाही.असे आश्वासीत केले.आमदार राणेंच्या एका फोन शालेय बस फेऱ्यांची समस्या तात्काळ मार्गी लागल्याने कळसुली गावच्या शिष्टमंडळाने, विद्यार्थी,पालक आणि शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे सरपंच सचिन पारधीये यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.*
*कणकवली आगारातून सायंकाळी चार वाजता सुटणारी कणकवली -कळसुली शालेय बस फेरी मागील दोन दिवसांपासून अचानक रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय झाली होती.आणि याचा फटका कळसुली हायस्कूल येथे शिक्षणासाठी जात असलेल्या हळवल,शिरवल या गावातील विद्यार्थ्यांना बसला होता.आणी नाहक त्रास सहन करीत त्यांना पायपीट करावी लागत होती.या पार्श्वभूमीवर आज कळसुली गावच्या च्या वतीने सरपंच सचिन पारधीये यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने एस. टी महामंडळाच्या कणकवली विभागीय कार्यालयात धडक देत विभागीय वाहतूक अधिकारी विक्रम देशमुख यांना जाब विचारला.यापुढे शालेय फेरी रद्द केल्यास खपवून घेतले जाणार नाही असा इशारा सरपंच सचिन पारधीये यांनी दिला. तसेच यापुढे शालेय बस फेऱ्या रद्द केल्यास आणि विद्यार्थ्यांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांना कणकवली -कळसुली मार्गावरुन पायपीट करायला लावू,मग समजेल कशी गैरसोय होते ती,असा इशारा सरपंच सचिन पारधीये यांनी अधिकाऱ्यांना दिला.*
*सरपंच सचिन पारधीये यांनी एसटी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराबाबत आमदार नितेश राणे यांना भ्रमणध्वनी वरुन फोन केला.आणि त्यांचे लक्ष वेधले.आमदार नितेश राणे यांनी तातडीने याची दखल घेतली आणि अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.त्यानंतर आमदारांच्या आक्रमक पवित्र्यापुढे नरमलेल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ ही समस्या मार्गी लावण्याने कळसुली गावच्या शिष्टमंडळाने आमदार नितेश राणे यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.**
*आज एसटी प्रशासनाला शिष्टमंडळाने भेट दिली.यामध्ये कळसुली सरपंच सचिन पारधीये, कळसुली हायस्कूल चे चेअरमन श्री.के.आर.दळवी, मुख्याध्यापक श्री.व्हि.व्हि.वगरे, अरुण दळवी, स्वप्नील गोसावी,शिवप्रसाद घाडीगांवकर, रजनीकांत सावंत,सिताराम देसाई,शुभदा देसाई, शिवाजी गुरव, विश्वनाथ लाड,संजना किर्तने आदी उपस्थित होते.*