*कोकण Express*
*राष्ट्रवादी काँग्रेस बांदा शहर युवती अध्यक्षपदी सुनिता भाईप यांची नियुक्ती*
राष्ट्रवादी काँग्रेस बांदा शहर युवती अध्यक्षपदी सुनिता भाईप यांची निवड. जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्ती पत्र. सावंतवाडी विधानसभा मतदार संघ अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या प्रणेने सुनिता भाईप या गेली चारवर्षे सक्रीय आहेत.त्यांच्या कामाची दखल घेत युवती जिल्हाध्यक्षा सावली पाटकर यांनी शिफारस केली होती.राष्ट्रवादी युवती काॅग्रेसच्या निमंत्रक खा. सुप्रियाताई सुळे व राष्ट्रवादी युवती काॅग्रेस प्रदेश अध्यक्षा कु.सक्षणा सलगर यांच्या मान्यतेने सुनिता संजय भाईप यांची बांदा शहर युवती अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. सावंतवाडी रविंद्र मंगल कार्यालयात आयोजीत जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी व्यासपीठावर निरीक्षक शेखर माने,माजी राज्यमंत्री प्रविण भोसले,सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्षा अर्चना घारे-परब, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे,युवती जिल्हाध्यक्षा सायली पाटकर, सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष सचीन पाटकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी,तसेच पदाधीकारी ऊपस्थीत होते.