*कोकण Express*
*अवैधरित्या परराज्यातील मद्याची वाहतुक करताना चारचाकी वाहनासह सुमारे 12 लाखाचा मुद्देमाल जप्त*
निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग या पथकाने राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर खामदेव नाक्याजवळ अवैधरित्या परराज्यातील मद्याची वाहतुक करताना चारचाकी वाहनासह सुमारे 12,12,000/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दि. 12/10/2023 रोजी मा. श्री. विजय सूर्यवंशी साहेब, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मा. श्री. सुनिल चव्हाण साहेब संचालक ( अं.व.द.) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, मा. श्री. विजय चिंचाळकर, विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभाग कोल्हापूर. मा. श्री. वैभव वैद्य, साहेब, प्र. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या खात्रीशीर बातमीनुसार बांदा परिसरात पाळत ठेवून संशयित वाहनांची तपासणी करीत असताना मिळालेल्या बातमीप्रमाणे नंबर असलेले एक सफेद रंगाचे महिन्द्रा बोलेरो पिकअप वाहन तपासणी कामी थांबविण्याच्या प्रयत्न केला असता ते न थांबता वेगाने पुढे निघुन गेल्याने सदर वाहनाचा शासकीय वाहनाने पाठलाग केला असता सदरचे वाहन खामदेव नाक्याजवळ, इन्सुली या ठिकाणी 23.45 वा च्या सुमारास थांबलेले दिसुन आले. सदर वाहनाजवळ जावुन पाहिले असता तसेच वाहनाच्या आजुबाजुस शोध घेतला असता त्याचा वाहन चालक किंवा अन्य इसम मिळुन आला नाही म्हणुन संशय वाढल्याने तपासणी केली असता सदर वाहनाच्या होद्यामध्ये जुन्या प्लायवुड फळ्यांच्या खाली लपवुन ठेवलेला मद्यसाठा दिसुन आला. म्हणून सदर चे वाहन तपासणी नाक्यावर आणुन त्याची कसून तपासणी केली असता गांवा बनावटीचा अवैध मद्यसाठा मिळुन आला. गाडीमध्ये मिळालेल्या कागदपत्रामधील तपशीलानुसार वाहन चालक नामे बांबा वालाभाई हनुभाई, रा. गुजरात यास फरार घोषित करुन महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. सदर गुन्ह्यामध्ये अं. रु. 5,10,000/- किमतीचे मद्य तसंच रु.7,00,000/- किमतीचे चारचाकी वाहन व मद्यसाठा लपविण्यासाठी वापरलेले प्लायवुडच्या फळ्यांची अंदाजे किंमत रु 2000/- असा एकुण अ. रु.12.12,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई मा. श्री. वैभव वैद्य, प्र. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सिंधुदुर्ग यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली श्री. संजय मोहिते, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क तपासणी नाका इन्सुली, श्री. तानाजी पाटील दुय्यम निरीक्षक, श्री. प्रदीप रास्कर दुय्यम निरीक्षक, श्री. गोपाळ राणे. सहाय्यक दुय्यम निरीक्षक व श्री. रणजीत शिंदे, जवान नि. वाहन चालक यांनी केली. सदर प्रकरणी पुढील तपास दुय्यम निरीक्षक, तपासणी नाका इन्सुली श्री. तानाजी पाटील हे करीत आहेत.