देशाच्या आदरणीय सैनिकाला माझा सॅल्यूट; मंत्री केसरकर यांची डॉन्टस यांना श्रद्धांजली…

देशाच्या आदरणीय सैनिकाला माझा सॅल्यूट; मंत्री केसरकर यांची डॉन्टस यांना श्रद्धांजली…

*कोकण Express*

*देशाच्या आदरणीय सैनिकाला माझा सॅल्यूट; मंत्री केसरकर यांची डॉन्टस यांना श्रद्धांजली…*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेली सैनिकी परंपरा आदर्शपणे जपण्याचे महान कार्य दिवंगत पी. एफ. डॉन्टस यांनी केलं आहे. त्याच सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रात योगदान महान आहे. देशाच्या अशा आदरणीय आणि चंदनीय सैनिकाला शासनाचा प्रतिनिधी म्हणून सॅल्यूट करणे माझे कर्तव्य मानतो. अशा भावपूर्ण शब्दात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यानी डॉटस यांना श्रद्धांजली व्यक्त केली.

सावंतवाडी येथील नवसरणी सभागृहात आज आयोजित केलेल्या स्व. पी.एफ. डॉन्टस यांच्या शोकसभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी राज्यमंत्री प्रवीण भोंसले, माजी खासदार ब्रिगेडीयर सुधीर सावंत, फादर मिलेट डिसूझा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण महिला प्रदेश अध्यक्षा अर्चना घारे परब, एम. डी. देसाई, सैनिक पतसंस्थाचे चेअरम बाबुराव कविटकर, पतसंस्थेचे रुजॉय रोड्रिक्स, राष्ट्रवादी काँगेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, माजी नगराध्यक्ष अॅड. दिलीप नार्वेकर, बबन साळगावकर, अनारोजिन लोबो, माजी उप नगराध्यक्षा अपूर्णा कोरगावकर, राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, शिंदे गट शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अशोक दळवी, मायकल डिसोजा, राजू मसुरकर, जिल्हा बँक संचालक रविंद्र मडगावर आदी उपस्थित होते.

शोक सभेची सुरुवात स्वर्गीय पी.एफ. डान्टस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

यावेळी ब्रिगेडियर सुधीर सावंत म्हणाले, माझे मित्र, सहकारी पी. एफ. डॉन्टस यांचे निधन आजही मनाला न पटणारे आहे. सैनिकी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर सहकार, राजकीय, सामाजिक क्षेत्रात त्यांनी माणसे घडवण्याचे काम केलं. समाजात काम करताना त्यांनी कधीही स्वतः ला डाग लागू दिला नाही. भविष्यात मोठा रोजगार देणारा उद्योग आणण्याचा आमचा उद्देश होता. मात्र हे काम अपुरे राहीले. अशी खंत सावत यांनी व्यक्त केली. सहकार क्षेत्रात उभ्या केलेल्या संस्था आणि त्यांचे अपूर्ण राहिलेले काम त्यांचे चिरंजीव जॉय डॉन्टस व त्यांच्या शिष्यांनी एकत्र येऊन पुढे नेऊया, असे सावत म्हणाले.

माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले म्हणाले, कैथोलिक समाजासोबतच अन्य समाजातील लोकांना पुढे घेऊन जाण्याची वृत्ती डॉन्स यांची होती. त्यांचे कार्य सार्वभौमत्व होते. नाझ्या जीवनात प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून त्यांचे स्थान खूप महत्त्वाचे होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सैनिक पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राऊळ यांनी केले. ते म्हणाले, पी एफ डॉन्टस हे पितृतुल्य व्यक्तिमत्व होत. नेतृत्व गुणांनी ओतप्रोत भरलेल व्यक्तिमत्व आज हरपले आहे. माजी सैनिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत काम केलं. आमच्यासाठी दीपस्तंभाप्रमाणे असणारे डॉन्टस या जगातून निघून गेले हे आजही मनाला पटत नाही.

यावेळी अॅड दिलीप नार्वेकर, सौ. अर्चना घारे अर्चना घारे, बबन साळगावकर, रुजॉय रोड्रिक्स, एम.डी देसाई, अनारोजिन लोबो, मायकल

डिसोजा, बाबुराव कविटकर, अशोक दळवी, साक्षी वंजारी, राजू मसुरकर, रमेश बोंद्रे, राजू तावडे, कुंदा पै, फादर मिलेट डिसूझा, अन्नपूर्णा

कोरगावकर आदींनी शब्द सुमनाने श्रद्धांजली व्यक्त केली.

आमच्यावर आलेल्या दुःखद प्रसंगी आमच्या कुटुंबाच्या पाठीशी राहिलेल्या सर्वाचे आम्ही डॉन्टस कुटुबीय ऋणी आहोत. वडील म्हणून त्यांनी केलेले विविध क्षेत्रातील कार्य जपण्याचे मी सदैव प्रयत्न करेन असे सांगून डॉन्टस यांचा मुलगा जॉय डॉन्टस यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

या शोकसभेला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, समीर वंजारी, एक्स सर्व्हिसेस लीगचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गावडे, दिनानाथ सावंत, माजी सैनिक तातोबा गवस, डॉ. विलास सावंत, कॅथलिक बँकेचे सीईओ जेम्स बोर्जेस, सैनिक स्कूलचे दिपक राऊळ, चंद्रशेखर जोशी, सुरेश भोगटे, फ्रान्सिस रोड्रिक्स, नीरज देसाई, कर्नल विजयकुमार सावंत, दिलीप भालेकर, बाळासाहेब बोर्डेकर, रमेश बोंद्रे, जिल्ह्यातील आजी- माजी सैनिक, डॉन्टस कुटुंबीय तसेच सामाजिक, शैक्षणिक, सहकार, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!