*कोकण Express*
*कणकवलीतील वीज समस्या बाबत ह्युमन राईट असोसिएश फॉर प्रोटेक्शनच्या वतीने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे वेधले लक्ष*
*कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी तातडीने दखल घेऊन उपाययोजना सुरू केल्या*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
ह्युमन राईट असोसिएश फॉर प्रोटेक्शनच्या वतीने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांना कणकवलीतील वीज समस्या बाबत लेखी निवेदन देण्यात आले.तसेच त्याबाबत सविस्तर चर्चा करून तातडीने उपाययोजना करण्याची आग्रही मागणी करण्यात आली.
कणकवली शहरातील परबवाडी, शिवाजी नगर,जळकेवाडी, पिळणकर वाडी,प्राथमिक शाळा नंबर -२ , मावूनमळा येथे गेले ३ ते ४ महिने कमी दाबाचा वीज पुरवठा होत आहे तसेच वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे.त्यामुळे विद्युत ग्राहकांची विद्युत उपकरणे नादुरुस्त व खराब होत आहेत.याबाबत ताबडतोब स्पाॅट सर्व्हे करून वरील सर्व समस्यांचे निराकरण करण्यात येईल असे आश्वासन कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी यावेळी दिले.
कार्यकारी अभियंता यांच्या आदेशानुसार उपकार्यकारी अभियंता विलास बगडे व कणकवली शहराचे विद्युत अभियंता श्रीराम शिंदे यांनी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांच्या समवेत तातडीने स्पाॅट सर्वे केला.
तसेच सातरल वरचीवाडी येथील नंदकुमार राणे यांच्या घराजवळून लाईन गेल्यामुळे पावसाळ्यात घरामध्ये वीज करंट जाणवत आहे.ही बाब देखील निदर्शनास आणून देताच यावर ताबडतोब कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.
तसेच कणकवली, देवगड, मालवण, वैभववाडी तालुक्यातील ज्या ठिकाणी उघड्या डिपी आहेत त्यांना लवकरात लवकर दरवाजे बसविण्यात येतील असे आश्वासन दिले.
याप्रसंगी निवेदन देतांना ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक,कणकवली तालुका कार्याध्यक्ष हनिफभाई पीरखान, कणकवली तालुका अध्यक्षा सौ.संजना सदडेकर , उपाध्यक्ष सदाशिव राणे, सदस्य भरत तळवडेकर उपस्थित होते.

