*कोकण Express*
*लाच घेतल्याप्रकरणी सावंतवाडी सहाय्यक पोलिस निरिक्षक लाचलुचपतच्या ताब्यात*
*रायगड लाचलुचपत विभागाची सावंतवाडी पोलीस ठाण्यातच कारवाई*
*अन्य एक पोलीस अधिकारी रडार ‘वर*
*सावंतवाडी । प्रतिनिधी*
फ्लॅट संदर्भातील फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकलेल्या बिल्डरकडून तडजोड करण्यासाठी एक लाखाची लाच घेतल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरिक्षकाला रायगड येथील लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतले. ही कारवाई आज सायंकाळी ६ वाजून २२ मिनीटांच्या सुमारास चक्क सावंतवाडी पोलीस ठाण्यातच करण्यात आली. याबाबतची तक्रार बिल्डर सिद्धांत परब यांनी केली होती.
दरम्यान, या प्रकरणी अन्य एका पोलीस उप निरीक्षकावर तक्रार दाखल असून त्याला देखील ताब्यात घेण्यात येणार आहे. सादतवाडी
पोलीस ठाण्यात याबाबतची कारवाई सुरु असून गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना स्थानिक लाचलुचपत विभागाकडे सुपूर्द करण्यात येणार
•असल्याची माहिती ठाणे लाचलूचपत विभागाचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी दिली.
सदरची कारवाई ठाणे लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक सुनिल लोखंडे व उपअधिक्षक अनिल गेर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे
लाचलूचपत विभागाचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, सहा. पोलीस निरीक्षक विनोद जाधव, हवालदार महेश पाटील, कौस्तुभ मगर,
विवेक खंडागळे, पोलिस नाईक सचिन आटपाटकर आदींच्या पथकाने केली.

