*कोकण Express*
*देवगड राज्यातील गणेश गावकर यांचा सुशांत नाईक यांनी केला सत्कार…*
*देवगड / प्रतिनिधी*
देवगड युवा सेना तालुका प्रमुख गणेश गावकर आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काल देवगड मध्ये आमदार नितेश
राणे यांना देवगड ग्रामीण रुग्णालयातील समस्यांबाबत विचारणा करण्या करीता गेले असता भाजप आणि युवा सेनेच्या पदाधिकायां मध्ये बाचाबाची होऊन हाणामारी ही झाली. आमदार नितेश राणे यांच्या समोर न डगमगता युवा सेनेचे तालुकाप्रमुख गणेश गावकरसह मोजकेच कार्यकर्ते भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांना भिडले देवगड तालुक्यातील गणेश गावकर यांच्यासह शिवसैनिकांच्या धाडसाबद्दल युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी त्यांचा सत्कार केला. समाजकार्य करीत असताना राणेंच्या दडपशाहीला न डगमगता किंवा पळुन न जाता जीवची परवा न करता लढतच राहीले. यावेळी देवगड तालुका प्रमुख जयेश नर, युवसेना जिल्हा समन्वयक राजु राठोड, तालुका प्रमुख उत्तम लोक, तालुका समन्वयक तेजस राणे, फोडा विभागप्रमुख सिद्धेश राणे, कणकवली उपशरप्रमुख वैभव मालडकर, नितेश भोगले, रोहित राणे, किरण चर्दम, प्रतिक रासम, प्रसाद चव्हाण, महेश राणे, गुरुनाथ पेडणेकर, चेतन पाटील आदी उपस्थित होते.

