*कोकण Express*
*नगरपालिकेने ठरवून दिलेल्या जागेतच मसाले व्यापाऱ्यांनी स्थलांतरित व्हावे यासाठी वेळ काढून नये मंत्री दीपक केसरकर*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
संत गाडगेबाबा भाजी मंडई लवकरच उभारली पाहिजे त्यासाठी अन्य व्यापात्यांप्रमाणे नगरपालिकेने ठरवून दिलेल्या जागेतच मसाले व्यापाऱ्यांनी स्थलांतरित व्हावे यासाठी वेळ काढून नये असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले तर सबंधित विक्रेत्यांना आवश्यक त्या
पत्र्याच्या शेड व फॅनची सुविधाही तेथे उपलब्ध करून देणेचे आश्वासन त्यांनी दिले मात्र पालिकेने ठरवून दिलेली जागा अपुरी असल्याचे गान्हा पुन्हा एकदा मसाले विक्रेत्यानी मांडले आम्हाला सहा सीटर स्टॅन्डची जागा उपलब्ध करून द्या अशी मागणीही त्यांनी केली परंतु मार्केट एका बाजूला आणि मसाले विक्रेते एका बाजूला चुकीचे असल्याने थोडे दिवस ऍडजेस्ट करा अशी
विनंती ही केसरकर यांनी केली.
सावंतवाडी संत गाडगेबाबा भाजी मंडईच्या नव्या इमारतीचे काम हाती घेण्यात येणार आहे त्यासाठी इमारतीमधील व्यापाऱ्यांना अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे परंतु या इमारतीमधील मसाले विक्रेत्यांनी दिलेल्या जागेमध्ये स्थलांतरित होण्यास नकार दिला होता ते अन्य पर्यायी जागेच्या मागणीवर ठाम होते एकूणच मसाले विक्रेत्यांच्या या भूमिके संदर्भात शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी सोमवारी सायकाळी उशिरा येथील नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहामध्ये संबंधित मसाले विक्रेत्याची बैठक बोलावली होती यावेळी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर तहसीलदार श्रीधर पाटील मुख्याधिकारी सागर साळुंखे उपस्थित होते. या बैठकीमध्ये मसाले विक्रेत्यांनी आपली बाजू मांडली तसेच पालिकेने ठरवून दिलेली जागा अपुरी असल्याचेही त्यांनी सांगितले यावेळी व्यापाऱ्यांची बाजू ऐकून घेत मंत्री केसरकार यांनी वस्तुस्थितीची पाहणी करण्यासाठी मसाले विक्रेत्यांच्या दुकानांना भेट दिली दरम्यान यावेळी काही झाले तरी पालिकेने ठरवून दिलेल्या जागेमध्ये तुम्हाला स्थलांतरित व्हावे लागणार आहे इतर व्यापाऱ्यांनी ऍडजेस्टमेंट केली आहे तसेच ऍडजेस्टमेंट थोडे दिवस आपण हे करा आपल्या मागणीप्रमाणे जर सहा सीटर स्टॅन्ड च्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली तर ते योग्य ठरणार नाही, पालिकेने ठरवून दिलेल्या जागेमध्ये आवश्यक ती सर्व सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे कुठे पत्र्याच्या शेड व त्यांची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे असे सांगत लवकरात लवकर स्थलांतरित व्हा असे आवाहन त्यांनी केले.