पंचायत समिती इमारत प्रस्तावात 12 कोटीची वाढ ठेकेदारांच्या भल्यासाठीच

पंचायत समिती इमारत प्रस्तावात 12 कोटीची वाढ ठेकेदारांच्या भल्यासाठीच

*कोकण Express*

*पंचायत समिती इमारत प्रस्तावात 12 कोटीची वाढ ठेकेदारांच्या भल्यासाठीच…*

*माजी आमदार उपरकर यांचा केसरकर यांच्यावर आरोप….*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

सावतवाडी पंचायत समिती इमारतीचा प्रस्ताव हा दोन कोटी रुपयांचा असताना यात 12 कोटीची वाढ कशी झाली? ठेकेदारचि भले करण्यासाठी मंत्री केसरकारांनी या प्रस्तावात वाढ केली असल्याचा आरोप मनसेचे नेते व माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज सावंतवाडी येथे केला.

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्याचे अंदाजपत्रक 30 कोटी असताना ते सुद्धा आता 100 कोटीच्या बाहेर जाईल आणि याला केसरकर जबाबदार असतील असा आरोप उपरकर यानी त्यावेळी केला. ते आज सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

भाजप आणि शिवसेना सात वर्ष सत्तेत आहेत. मात्र जिल्ह्यात कुठलेही विकास कामे आणले नाहीत. त्यांच्यात आता श्रेय वादासाठी भांडणे

सुरु आहेत. असा आरोप उपरकर यानी केला.

यावेळी माजी शहराध्यक्ष तथा मनविसे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, मनसे रस्ते सुविधा आस्थापना जिल्हासंघटक अभय देसाई, मनविसे जिल्हा सचिव निलेश देसाई, माजी तालुका सचिव राजेश रंगसाळी, विद्यार्थीसेना तालुकाध्यक्ष संदेश सावंत उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!