*कोकण Express*
*विविध गुणांचा आणि कौशल्यांचा विकास होण्यासाठी खेळ महत्वाचा ; संजय पाताडे*
*कणकवली तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेचे कासार्डेत शानदार उद्घाटन*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
खेळ हा मुलांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या भागाचे आहे, खेळ खेळल्यामुळे मुलांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास होतो.त्याचबरोबर खिलाडूवृत्ती,संघटन कौशल्य,सहकार्यवृती, यासारख्या अनेक गुणांचा विकास होण्यास मदत होते.विशेष म्हणजे मैदानी खेळ खेळल्यामुळे मुलांच्या मनावरील ताणतणाव कमी होतो, म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी चांगल्या आरोग्यासाठी आणि सुदृढ शरीरासाठी तसेच आनंद जीवन जगण्यासाठी खेळात सहभागी होवून आनंद घ्यायला हवा असे प्रतिपादन स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे यांनी कासार्डे येथे आयोजित कणकवली तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी काढले.
कणकवली तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेचे आयोजन कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे मैदानावर करण्यात आले आहे.
उद्घाटन सोहळ्याला कासार्डे विकास मंडळ, मुंबईचे उपसचिव आनंद कासार्डेकर, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे,पदाधिकारी प्रभाकर कुडतरकर, कार्यवाह रविंद्र पाताडे, प्राचार्य एम.डी.खाड्ये, पर्यवेक्षक एन.सी.कुचेकर, तालुका समन्वयक बयाजी बुराण, महाराष्ट्र अथलॅस्टिक असोसिएशनचे सदस्य तथा राष्ट्रीय पंच बाळकृष्ण कदम,कासार्डे विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड,अजितकुमार देठे,संजय सावळ,
श्री.मोहिते,अमोल चौगुले
,श्री.डांगे,श्री.आडोलीकर,प्रा.दिवाकर पवार,सौ.पुजा पाताडे,सौ.शिरसाट
व्ही.के.खंडवी,श्री.
पवार, अजिंक्य पोफळे,हरेष वाघाटे यांच्यासह अन्य क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
याप्रसंगी संस्था पदाधिकारी आनंद कासार्डेकर यांच्या हस्ते ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, तसेच प्रभाकर कुडतरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तर संजय पाताडे यांच्या हस्ते मैदानावर श्रीफळ वाढवून तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेचे शानदार उद्घाटन झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका समन्वयक बयाजी बुराण यांनी केले.तर सुत्रसंचलन दत्तात्रय मारकड यांनी केले.शेवटी विद्यालयचे पर्यवेक्षक एन.सी.कुचेकर यांनी आभार मानून खेळाडुंना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेला पंच म्हणून राष्ट्रीय पंच बाळकृष्ण कदम,बयाजी बुराण,दत्तात्रय मारकड,
संजय सावळ,अजितकुमार देठे,श्री.डांगे, अजिंक्य पोफळे, दिवाकर पवार,ऋषिकेश खटावकर,पुजा पाताडे,
निकिता लाड, हरेष वाघाटे, विठ्ठल खांडवी,प्रविण पडेलकर ,प्रज्ञेश निग्रे,रोहन कांबळे,गौरव सुतार आदी पंच म्हणून उत्तम कामगिरी बजावत आहे.
सलग दोन दिवस सुरू असलेल्या यास्पर्धेला कणकवली तालुक्यातील विविध शाळांमधून ६००पेक्षा अधिक खेळांडुंनी सहभाग घेतला आहे.,सुसज्ज आणि नेटक्या आयोजनाबद्दल तालुका समन्वयक बयाजी बुराण तसेच तालुक्यातील क्रीडा शिक्षक व संघव्यवस्थापकांनी कासार्डे शिक्षण संस्था, प्राचार्य व विद्यालयाच्या संपूर्ण टीमला विशेष धन्यवाद दिले.