*कोकण Express*
*माता भगिनींसाठी करमणुकीच साधन म्हणून खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन,प्रत्येक स्त्री घरची लक्ष्मी..*
*सौ.वेदिका परब यांच्या हस्ते महिलांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान..*
*दोडामार्ग प्रतिनिधी*
युवा उद्योजक उद्योजक विशाल परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत दोडामार्ग येथे करमणुकीचे साधन म्हणून खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.स्त्री ही प्रत्येक घरची लक्ष्मी असते ती नेहमीच आपल्या घरासाठी धडपडत असते. त्यामुळे अहोरात्र काम करुन थकलेल्या माझ्या माता भगिनीसाठी करमणुकीच साधन म्हणून हा खेळ पैठणीचा कार्यक्रम ठेवला आहे. भविष्यात महिलांसाठी यापेक्षा मोठे कार्यक्रम घेऊ अशी ग्वाही विशाल परब यांच्या अर्धांगीनी सौ.वेदिका परब यांनी दिली. दरम्यान सौ.परब यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.