*कोकण Express*
*माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेतर्फे ग्राम स्वच्छता मोहिम*
कणकवली ः प्रतिनिधी*
कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी आणि बालमंदिर कनेडी येथे शनिवार दिनांक ०७ ऑक्टोबर २०२३ रोजी महात्मा गांधी जयंती ०२ ऑक्टोबर निमित्त “ग्राम स्वच्छता अभियान ” राबविण्यात आला*.
*माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेतर्फे दरवर्षी ग्राम स्वच्छता मोहीमचे आयोजन केले जाते, या स्वच्छता मोहिमेची प्रदीर्घ अशी परंपरा प्रशालेने अबाधित राखलेली आहे यामध्ये प्रशालेतील संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली* *तसेच भिरवंडे, कनेडी, सांगवे परिसरातील विठ्ठल मंदिर परिसर, शाळी विहीर परिसर, प्राथमिक आरोग्य केंद्र , चर्च परिसर, वृद्धाश्रम, बिर्बा देवी मंदिर परिसर*,*सांगवे रामेश्वर मंदिर, भिरवंडे रामेश्वर मंदिर अशा सामाजिक व धार्मिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली*
*सदर स्वच्छता मोहिमेचे मार्गदर्शन प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य मा.श्री. सुमंत दळवी, पर्यवेक्षक मा. श्री. बयाजी बुराण, यांनी केले. या प्रसंगी प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते*.