ऑस्ट्रेलिया येथे कृषी उद्योजकता प्रशिक्षणासाठी देऊळवाडा येथील मानसी डिचवलकर हिची निवड

ऑस्ट्रेलिया येथे कृषी उद्योजकता प्रशिक्षणासाठी देऊळवाडा येथील मानसी डिचवलकर हिची निवड

*कोकण Express*

*ऑस्ट्रेलिया येथे कृषी उद्योजकता प्रशिक्षणासाठी देऊळवाडा येथील मानसी डिचवलकर हिची निवड*

*देऊळवाडा ग्रामस्थांनी आ. वैभव नाईक यांच्या हस्ते मानसी डिचवलकर हिचा केला सत्कार*

ऑस्ट्रेलिया येथे कृषी उद्योजकता आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी देऊळवाडा येथील मानसी उमेश डिचवलकर हिची निवड झाली आहे.त्याबद्दल मालवण देऊळवाडा तेलीवाडी येथील महापुरुष मंदिरात ग्रामस्थांच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करून आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते मानसी डिचवलकर हिचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर तिच्या आई वडिलांचाही सत्कार करण्यात आला. तसेच चंदना दिनेश डिचवलकर हिने दहावी परीक्षेत ९५ टक्के गुण मिळविल्याबद्दल तिचाही सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी,युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, सन्मेष परब,मनोज मोंडकर, सुहास वालावलकर,उमेश चव्हाण,केदार वालावलकर, नितीन बांदेकर,सदानंद डिचवलकर,अमित डिचवलकर, नीतिन बांदेकर, योगेश वालावलकर, कुणाल वालावलकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!