*कोकण Express*
*जी.बी प्लस आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धेत तळेरेची कु.मोनाली शंकरदास प्रथम*
*:कासार्डेचे आदित्य सावंत द्वितीय तर गुरूनाथ पाताडे- तृतीय*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
जी बी प्लस टेक्नोलॉजीस् काॕम्प्युटर आणि टायपिंग इन्स्टिट्यूट,तळेरे यांच्यावतीने आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धेत तळेरेची मोनाली शंकरदास- प्रथम,आदित्य सावंत- कासार्डे (द्वितीय ) तर गुरूनाथ पाताडे-कासार्डे यांना तृतीय क्रमांक मिळाला आहे.
विजेत्या स्पर्धकांना प्रथम पारितोषिक ३०००/- आणि आकर्षक चषक , व्दितीय पारितोषिक २०००/- व आकर्षक चषक तर तृतीय क्रमांक प्राप्त स्पर्धकाला पारितोषिक १०००/- आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
याशिवाय या स्पर्धेत सहभागी १४ स्पर्धकांना प्रोत्साहनपर उत्तेजनार्थ बक्षीसे देवून सन्मानित करण्यात आली आहे.
*स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे -*
सर्वोत्कृत डेकोरेशन विजेते-
१. मोनाली शंकरदास
२. आदित्य सावंत
३. गुरूनाथ पाताडे
*उत्तेजनार्थ पारितोषिक विजेते*
केशव सावंत,अवधूत राणे,श्रीपात पाताडे,पूजा येरम ,मिहिर राणे, अंकिता बांदिवडेकर ,अभिजीत कांबळे , श्रावणी तळेकर,रोमित नारकर,जिग्नेश वारंगे , सायली पांचाळ, निकिता आईर, वैभव चव्हाण व
सुमंगल गुरव आदी स्पर्धकांचा ही गुणगौरव करण्यात आला.
या सर्व यशस्वी स्पर्धकांचे
जी बी प्लस टेक्नॉलॉजी कंप्युटर आणि टायपिंग सेंटर तळेरेच्या संचालिका,
सायली शशिकांत खंडमळे , संचालक सागर भगवान खंडमळे यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.