*कोकण Express*
*”मेरी माटी मेरा देश” या संकल्पनेच्या पथनाट्याने प्रेक्षकांची मने जिंकली*
*विद्यामंदीर प्रशालेच्या विद्यार्थ्यांचे पथनाट्यामुळे होतेय कौतुक*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
‘मेरी माटी मेरा देश ‘ या संकल्पनेवर आधारीत विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेच्या’पथनाट्याने
कणकवली पंचायत समिती मध्ये प्रेषकांचे मन जिंकून घेतले .
भारतीय संस्कृती कृषीप्रधान आहे. माती आणि देश यांचे अतुट नाते जोपासले तरच देशाची प्रगती होईल . म्हणून आज देशातील माणसांच्या राक्षसी वृत्तीवर प्रहार करणारे पथनाट्य विद्यामंदिर प्रशालेने अल्पावधित दिग्दर्शन करून माती व देशाचे ऋ्णानुबंध संपूर्ण कणकवली तालुक्यातील ग्राम वासियांना दाखवून दिले प्रशालेच्या बाल कलाकारांनी आपल्या अभिनयाने सिद्ध करून दाखविले उत्कृष्ट निवेदन तंत्राने भारताचे पर्यावरण ‘ आरोग्य ‘ शेती ‘ स्वच्छता ‘ विज्ञान क्रांती यांचे दर्शन कुमारी मृणाल पाटील हिने सादर करून दाखविले तसेच योग साधने द्वारे आणि संगीत कलेतून प्रेषकांना दाखवून दिले . जलकुंभ आणि भारत यांचा समन्वय साधून मेरीमारी मेरा देश जन सामान्या पर्यंत आकर्षक पद्धतीने पोहचवून प्रेषकांची मने जिंकून घेतली व शाब्बास की थाम मिळवून कौतुक झाले
या पथनाट्याचे दिग्दर्शन अभिनेता आदरणीय निलेशजी पवार साहेब यांनी केले तसेच जेम्स संस्थेचे श्री अमोल पोवार साहेब यांचे सहकार्य लाभले प्रशालेच्या विज्ञान शिक्षिका सौ केळुसकर मॅडम यांनी परिश्रम घेऊन पथनाट्य यशस्वी करून सिद्ध केले सौ . शिरसाट ‘ सौ . लिमये मॅडम श्री शेळके जे जे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .
प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सर यांनी सर्व अध्यापक व कलाकार यांना प्रोत्साहन देऊन पथनाट्याला बळ दिले . यासाठी पर्यवेक्षक सौ जाधव मॅडम श्री वणवे सर यांनी या पथ नाट्याच्या यशस्वीसाठी पाठबळ दिले .