*कोकण Express*
*किर्लोसमध्ये भव्य प्राथमिक आरोग्य शिबिर संपन्न*
*किर्लोस ः प्रतिनिधी*
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यताप्राप्त छत्रपति शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस ओरोस येथील ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत किर्लोस येथील कृषीदुत व ग्रामपंचायत कार्यालय किर्लोस, प्राथमिक आरोग्य केंद्र हिवाळे यांच्यामार्फत मोफत वैदयकिय उपचार शिबिराचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावठणवाडी किर्लोस येथे करण्यात आले
कार्यक्रमाचे उद्घाटन किर्लोस गावच्या सरपंच सौ. साक्षी चव्हाण व ग्रामंचायत सदस्य नुतन घाडीगावकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व धन्वंतरी मुर्ती पुजनाने झाले.त्यानंतर ग्रामसेवक श्री. डी. एन. रावले यांनी आरोग्याविषयक घ्यावयाची काळजी याबद्दल आपले मत मांडले. डॉ. ओंकार परब यांनी दैनंदिन आहार व नियमित व्यायाम याबद्दल आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डॉ. सौ.समिता बिरमोळे यांनी स्त्रीयांचे विविध विकार व त्यावरील उपाय व नियोजन याविषयी मत व्यक्त केले.त्यानंतर रुग्णांनी नाव नोंदणी करून आपल्याला होणाच्या आजाराचे निदान व उपचार करून घेतले.सदर शिबिरामध्ये सी बी सी चाचणी, किडनी फंकशन चाचणी, थायराईड चाचणी, कॉलेस्ट्रॉल चाचणी, शुगर चाचणी, रक्त चाचणी इ. मोफत तपासणी करण्यात आली
सदर कार्यक्रमास गावच्या सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक,ग्रामपंचायत कर्मचारी,आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी वर्ग, शाळेचे शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. सदर कार्यक्रम छत्रपती शिवाजी कृषी महाविदयालयाचे प्राचार्य प्रा. पेडणेकर सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. परुळेकर सर, प्रा. खरात सर,प्रा. गायकी सर. प्रा. कोरगावकर सर, प्रा. ओगले सर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत मंगेश गुरव, सौरभ रजपूत, यश भुसान्ना, ऋषिकेश पाटिल, गौतम के.पी. अंकित भोये, प्रतिक कदम यानी हा उपक्रम राबविला