अंतराळवीर एक संधी: डॉ.अमित लाड

अंतराळवीर एक संधी: डॉ.अमित लाड

*कोकण Express*

*अंतराळवीर एक संधी: डॉ.अमित लाड*

आजच्या विद्यार्थ्यांसाठी संशोधन क्षेत्र हे खुले असून अंतराळवीर होण्याची संधी आज उपलब्ध झालेली आहे त्यासाठी या क्षेत्राकडे भविष्याच्या उज्वल दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे असे प्रतिपादन टाटा संस्था मुंबई चे वैज्ञानिक अधिकारी डॉक्टर अमित लाड यांनी भारताची चांद्रयान 3 मोहीम या व्याख्यानाच्या निमित्ताने काढले. यावेळी बोलताना भारताने चंद्र मोहीम कशी यशस्वी केली त्यासाठी शास्त्रज्ञानी कशी मेहनत घेतली व त्याचबरोबर अशा मोहिमा कशा यशस्वी होतात व त्याचबरोबर या मोहिमा कोणत्याही देश करण्यामागील कोणती करणे आहेत याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनीही अंतराळ बनावे व यासाठी आपणास संधी निर्माण होत आहेत याचा लाभ घ्यावा व देशाचे नाव उज्वल करावे अशी व्याख्यान प्रसंगी उद्गार काढले. या वेळी विजय कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच देविदास पवार यांच्या हस्ते कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाला व मुख्याध्यापक वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (सं)कट्टा यांना भेटवस्तू देऊन सन्मान केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अजय राज वराडकर यांनी मोहिमेविषयी ची यशस्वी ते बद्दल बोलताना भारतीय अवकाश संशोधन मधील शास्त्रज्ञ व त्यांच्या मेहनतीचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना प्रेरणा घेण्याचे आवाहन करून यशस्वी होण्याचा मंत्र दिला. व्याख्यानाची सुरुवात ही अंतराळ मोहिमेच्या चित्रफितीच्या माध्यमातून झाली तसेच चांद्रयान मोहीम 3 चे यशस्वी प्रक्षेपण व त्यासाठी करण्यात येणारी कृती यांचे चलचित्र विद्यार्थ्यांसमोर दाखवण्यात आले. या व्याख्यानाची सांगता ही मुलांच्या प्रश्न उत्तराच्या माध्यमातून झाली. यावेळी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद हा उत्साहवर्धक होता. या कार्यक्रमासाठी उपस्थित डॉ.अमित लाड वैज्ञानिक अधिकारी टाटा मूलभूत संस्था यांचा सत्कार कट्टा कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री अजय राज वराडकर यांनी केला तसेच वैज्ञानिक अधिकारी देविदास पवार, श्री यश वेध, श्री विजय कदम यांचा सत्कार कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री सुनीलजी नाईक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सुधीर वराडकर, सचिव श्रीमती विजयश्री देसाई मॅडम यांनी केला तर कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री अजय राज वराडकर यांचा सत्कार प्रशालेचे मुख्याध्यापक श्री संजय नाईक यांनी केले तसेच कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा चे सचिव श्री सुनीलजी नाईक व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सुधीर वराडकर ,सचिव श्रीमती विजयश्री देसाई, यांचा सत्कार वराडकर इंग्लिश मीडियमचे मुख्याध्यापक श्री ऋषी नाईक, पर्यवेक्षिका सौ देवयानी धनंजय गावडे तसेच विज्ञान प्रमुख श्री महेश विठ्ठल भाट यांनी केला या कार्यक्रमाच्या निमित्ताने विश्वस्त एडवोकेट श्री एस एस पवार तसेच कर्नल श्री.शिवानंद वराडकर यांनी कार्यक्रमाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या व्याख्याना बरोबरच विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रकाश कानूरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री संजय नाईक यांनी केले यावेळी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षिकेतर कर्मचारी विद्यार्थी वृंद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!