*कोकण Express*
*राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज भारतीय जनता पार्टी घोणसरी च्या वतीने स्वच्छता ही सेवा अभियान*
आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान सन्मा.श्री नरेंद्र मोदीसाहेब यांच्या स्वच्छता ही सेवा या संकल्पनेला एक राष्ट्रीय कर्तव्य समजून भारतीय जनता पार्टी घोणसरी च्या कार्यकर्त्यांनी आज घोणसरी एस् टी बस स्थानक परीसरात दोन तास साफसफाई करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी घोणसरी बुथ अध्यक्ष श्री बाबुराव ( प्रकाश)राणे घोणसरी सरपंच श्री मॅक्सी पिंटो मा.उपसरपंच श्री विलास मराठे वि.का.स.सो.संचालक श्री मकरंद पारकर जेष्ठ नागरिक सेवानिवृत्त शिक्षक श्री जाधव गुरुजी अनिल राणे सामा.कार्यकर्ते मिलिंद मराठे मा.उपसरपंच श्री रविन्द्र(लवु)सावंत श्री अनंत गुरव श्री रॉबर्ट रैस श्री उमेश राऊत मा.पो.पा.श्री चंद्रकांत जाधव आबा साळुंखे प्रविण बुकम प्रमोद राणे किरण पेडणेकर आदि कार्यकर्ते उस्फूर्त सहभागी झाले होते.