शिवशौर्य यात्रेचे तळेरेत भव्य स्वागत : शिवराज्याभिषेक ३५० व्या वर्षाचे निमित्त

शिवशौर्य यात्रेचे तळेरेत भव्य स्वागत : शिवराज्याभिषेक ३५० व्या वर्षाचे निमित्त

*कोकण Express*

*शिवशौर्य यात्रेचे तळेरेत भव्य स्वागत : शिवराज्याभिषेक ३५० व्या वर्षाचे निमित्त*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष असून या निमित्ताने विश्व हिंदू परिषद – बजरंग दल कोकण प्रांतच्यावतीने शिवशौर्य यात्रेचे रविवारी दुपारी तळेरे येथे भव्य स्वागत करण्यात आले. लेझिम पथक, ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणांनी या यात्रेचे स्वागत झाले. यावेळी पंचक्रोशीतील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, वक्ते डॉ. मिलिंद कुलकर्णी, राजू जठार, मारुती वळंजू, सूर्यकांत तळेकर, सुधीर नकाशे, बाळा जठार, रिक्षा,टेंम्पो संघटनेचे सभासद, निलेश तळेकर, चंद्रकांत तळेकर, बाजारपेठ मित्र मंडळ अध्यक्ष सचिन पिसे, संदिप घाडी, अशोक तळेकर, शशांक तळेकर, भरत चव्हाण, सुधाकर राणे, अक्षय मेस्त्री, दळवी महाविद्यालयाचे प्रा. हेमंत महाडिक, तळेरे विद्यालयाचे शिक्षक बी. एन. तडवी यांच्यासह अनेक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी भारत माता की जय, जय जय जय भवानी जय जय जय शिवाजी आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला. या यात्रेचे आगमन झाल्यानंतर छ. शिवाजी महाराज यांचे पूजन करण्यात आले. महिलांनी औक्षण करून पारंपारिक हिंदू पध्द्तीने स्वागत करण्यात आले. यावेळी तळेरे दशक्रोषितील अनेक महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वामनराव महाडिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे लेझीम पथक आणि घाडीवाडी ढोलपथक यांनी या यात्रेत उत्स्फूर्तता आणली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!