*कोकण Express*
*तुझे परदेश दौऱ्यातील फोटो “आयटनरी” सकट जाहिर करून वस्त्रहरण करेन*
*आमदार नितेश राणे यांनी दिला आदित्य ठाकरे यांना सज्जन दम*
*आदित्यचे घड्याळ, गाडी सुद्धा दुसऱ्याच्या पैशातून*
*डावस मध्ये कोणत्या कोकिळे बरोबर मिठू मिठू गात होता ते सांगण्याची वेळ आणू नका*
*तेजस ची कोरोनाली पार्टी आणि लंडन मधील फोटो कोठून आले ते सांगू काय ?*
*कणकवली ः प्रतिनिधी*
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्यामुळेच राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे.ज्यांनी महाविकास आघाडीची सत्ता होती तेव्हा एक सुद्धा परदेशी दैरा स्वतःच्या पैशाने केला नाही.त्या आदित्य ठाकरे यांनी, मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि उद्योग मंत्र्यांवर टीका करण्याचे धाडस करू नये. स्वतःच्या खिशात हात घालून स्वतःचे खर्च करणे ठाकरे कुटुंबांच्या कुंडलीतच नाही. अंगावरील वस्त्रांपासून घड्याळ, गाडी, जे दुसऱ्याच्या पैशातून वापरतात अशा आदित्य ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या सत्तेच्या वेळी डावस चा दौरा केला, त्यावेळी काय दिवे लावले. स्वतःचा म्याऊ म्याऊ असलेला आवाज बदलण्यासाठी कोणते उपचार घेतले. कोणत्या कोकिळे बरोबर मिठू मिठू गात होता. याची खड्यान खडा माहिती माझ्याकडे आहे खूप खोलात उतरायला लावू नका तुमचे परदेश दौऱ्यातील फोटो “आयटनरी” सकट जाहिरात करू आणि महाराष्ट्रातील जनतेसमोर तुझं वस्त्रहरण करू असा इशारा भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना दिला आहे.
आमदार नितेश राणे यांनी कणकवली ओम गणेश निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी आदित्य ठाकरे यांचा त्यांनी जोरदार समाचार घेतला.कालपासून आदित्य ठाकरे ने म्याव म्यावं सुरू केले आहे. त्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा
जपान दौरा, उद्योग मंत्र्यांवर टीका असे प्रकार सुरू आहेत. ज्यांनी स्वतःच्या खिशातून कधीच खर्च केला नाही त्या आदित्य ठाकरे यांची गाडी एका आमदारांच्या मेडिकल कॉलेज च्या नावाने आहे. ज्या घरात राहतात त्याचे एसी दुसऱ्याने दिलेले आहेत.त्यांनी यापुढे टीका करताना दोन वेळा विचार करावा. डावस ला गेला होता तेव्हा काय रंग उधळलेले आहेत ते आम्हाला माहित आहे.कोणत्या कोकिळे बरोबर मिटू मिटू गात होता हे सुद्धा आम्हाला माहित आहे.जर तू परत आरोप केले तर तुझ्या दौऱ्याची खरी माहिती जनतेला देणार असा इशाराच आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.
तेजस आणि आदित्य यांच्यामधील संघटनात्मक स्पर्धा वाढलेली आहे आणि त्यातून हे आरोप स्वतःला सिद्ध करण्यासाठी आदित्य ठाकरे करत आहे. असा गौप्यस्फोट आमदार नितेश राणे यांनी केला.दोन्ही भावात स्पर्धा म्हणून हे चालले आहे. लहान भावाने ग्रीप पकडली आहे. त्याला मागे टाकण्यासाठी
छोट्या भावाला लहान करण्यासाठी आदित्य चा हा प्रकार आहे .कोविड काळात ती पार्टी आणि त्याचे बिल चे फोटो कोणी दिले याची माहिती द्या, लंडन मधले तेजस चे फोटो कोणी पाठवले.ते मातोश्री वरूनच भाजप च्या आमदारांना गेले. त्याचा शोध घ्या.तुम्ही आपसात भांडत रहा मात्र तुमच्या भांडणात आम्हाला घेवू नका. भाजप वर टीका करू नका. नाहीतर तुमचा खरा कार्यक्रम जाहिरात करू आणि कोणासोबत होतास हे सांगू असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला.
जरांगे पाटील यांनी सरकार काम करत आहे त्याची माहिती घ्यावी.जे काम स्वर्गीय विनायकजी मेटे यांनी सुरू केलेले ते पुढे नेण्याची संधी जरांगे पाटील यांनी घ्यावी. उगाच टीका करत बसू नये.
*बॉक्स*
महाविकास आघाडीचे सरकार असताना तुम्ही संतासारखे वागले नाही. आमच्या घरावर बुलडोझर घेऊन तीनशे – तीनशे अधिकारी पाठवले तेव्हा आम्ही शेंबड्या मुलासारखे,तुम्ही रडता तसे रडत राहिलेले नाही. योग्य पद्धतीने उत्तर दिले , आणि सत्याची बाजू आमची असल्यामुळे न्याय मिळाला.रोहित पवारा किंवा अन्य कोणाला नोटीस आले असतील तर त्यांनी प्रक्रियेला सामोरे जावे.असे सुनावले.
यापूर्वीच मी सांगितलेल्या आहे की अंबादास दानवे यांचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद काढून घ्यायचे आहे आणि म्हणूनच त्यांच्यावर ओबीसी प्रमाणपत्र चुकीच्या पद्धतीने मिळवण्याचा आरोप केला जातोय. ही एक नवीन चाल आहे. आता हे विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेसला हवे आहे म्हणून हा प्रकार चाललेला आहे. यांची तीन डोकी एकत्र राहत नाहीत आणि चालले पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करायला अशी टीका यावेळी आमदार नितेश राणे यांनी केली.