जिल्हास्तरीय शालेय ज्यूदो स्पर्धेत कासार्डे विद्यालय अव्वल

जिल्हास्तरीय शालेय ज्यूदो स्पर्धेत कासार्डे विद्यालय अव्वल

*कोकण Express*

*जिल्हास्तरीय शालेय ज्यूदो स्पर्धेत कासार्डे विद्यालय अव्वल*

*प्रशालेच्या १३ ज्युदोपट्टूंची कोल्हापूर विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग, जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित व सिंधुदुर्ग जिल्हा ज्युदो असोसिएशनच्या सहकार्याने सिंधुदुर्गनगरीतील जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या शालेय जिल्हास्तरीय ज्यूदो स्पर्धेत कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे खेळाडूंनी या स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले असून बहुतांश वजनी गटात कासार्डे विद्यालयाच्या खेळाडुंनी बाजी मारत अव्वल स्थान पटकावले आहे.
कासार्डे विद्यालयाच्या तब्बल २४ ज्युदो खेळाडूंनी विविध वयोगट तसेच वजनीगटात अभिनंदनीय यश संपादन केले आहे.
*यशस्वी खेळाडू पुढीलप्रमाणे-*
*१४ वर्षा खालील मुलांच्या विविध वजन गटात -*
ध्रुव अभिजीत शेट्ये-(प्रथम),
आदर्श दीपक जाधव-
(प्रथम),अमोल दीपक जाधव-(प्रथम),सोहम सत्यवान पाटील-(प्रथम), विघ्नेश संतोष पेडणेकर-
(प्रथम),
*१४ वर्षाखालील मुलींच्या विविध वजनी गटात-*
सलोनी संतोष पेडणेकर-( द्वितीय ),
धैर्या अरविंद परब -(द्वितीय),
शिवानी महादेव जाधव -(द्वितीय),ऋतुजा धनाजी शिंदे (द्वितीय),दिक्षा बन्सीलाल सुथार -(प्रथम),
*१७ वर्षाखालील मुलांच्या विविध गटात -*
दुर्वास संजय पवार (प्रथम),
विश्वास चंदू चव्हाण-(प्रथम),
आर्यन अजय कदम(द्वितीय ),किशोर बाबूलाल देवासी -(द्वितीय),
आराध्य प्रवीण तळेकर-
(प्रथम),
*१७ वर्षाखालील मुलींच्या विविध गटात-*
रिद्धी प्रशांत राणे -(प्रथम), रिद्धी अरविंद परब-(तृतीय), कु.उर्वी गुरूप्रसाद पाटील (द्वितीय),साक्षी संतोष तेली-(द्वितीय),आसावरी हर्षकांत तानवडे-(द्वितीय),
*१९वर्षाखालील मुलांच्या गटात-*
पार्थ प्रकाश पाटील-(द्वितीय)
*१९ वर्षाखालील मुलींच्या विविध गटात-*
सृष्टी दीपक राणे – (प्रथम), भार्गवी संजय खानविलकर- (प्रथम),भक्ती महेश लाड-(प्रथम),अनुष्का दिपक जाधव- (द्वितीय) आली आहे.वरील यशस्वी ज्यूदोपट्टूंमधून प्रथम क्रमांक प्राप्त १३ खेळाडूंची कोल्हापूर विभागीय ज्युदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशस्वी खेळाडूंना विद्यालयचे क्रीडा शिक्षक तथा सिंधुदुर्ग जिल्हा ज्युदो असोसिएशनचे सचिव दत्तात्रय मारकड, ज्युदो प्रशिक्षक अभिजित शेट्ये,सोनू जाधव विद्यालयचे मार्गदर्शक शिक्षक-शिक्षिका सौ.विधी मुद्राळे,प्रा.दिवाकर पवार,अवधुत कानकेकर,ऋषिकेश खटावकर,कु.प्रियंका सुतार, तसेच क्रीडा विभागातील इतर शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
या यशस्वी ज्यूदोपट्टूंचे सिंधुदुर्गाच्या जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीम.विद्या शिरस,तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे,कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष परशुराम माईणकर,सरचिटणीस रोहिदास नकाशे, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे,स्कूल कमिटी चेअरमन अरविंद कुडतरकर, विद्यालयचे प्राचार्य एम.डी.खाड्ये,पर्यवेक्षक एन.सी.कुचेकर ,जेष्ठ शिक्षिका सौ बी.बी.बिसुरे, तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करुन कोल्हापूर विभागीय ज्युदो स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!