कणकवली बीडीओपदी अरूण चव्हाण यांना पदोन्नती

कणकवली बीडीओपदी अरूण चव्हाण यांना पदोन्नती

*कोकण Express*

*कणकवली बीडीओपदी अरूण चव्हाण यांना पदोन्नती!*

*अरूण चव्हाण हे फोंडा गावचे सुपुत्र ; पं. स. च्या इतिहासात पहिल्यांदाच बीडीओ होण्याचा बहुमान*

*कणकवली  ः प्रतिनिधी*

कणकवली पंचायत समितीच्या रिक्त असलेल्या गटविकास अधिकारी पदावर सध्या सहाय्यक गटविकास अधिकारी पदी कार्यरत असलेल्या अरुण शांताराम चव्हाण यांना पदोन्नती देण्यात आली आहे. अरूण चव्हाण हे फोंडा गावचे सुपुत्र असून पं. स. च्या इतिहासात पहिल्यांदाच कणकवली तालुक्याच्या सुपुत्राला बीडीओ होण्याचा बहुमान मिळाला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत महाराष्ट्र विकास सेवेमधील सहाय्यक गटविकास अधिकारी गट व संवर्गात कार्यरत असलेल्या राज्यातील २४ अधिका-यांना गटविकास अधिकारी गट – अ या संवर्गात पदोन्नती दिली आहे. २७ सप्टेंबर रोजी या विषयीचा शासन निर्णय काढण्यात आला असून त्यामध्ये कणकवली पं. स. च्या रिक्त असलेल्या गटविकास अधिकारी पदावर अरुण चव्हाण यांना पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामुळे गेली ३ वर्षे रिक्त असलेल्या कणकवली पं. स. च्या बीडीओ पदावर अरुण चव्हाण यांच्या रुपाने पूर्णवेळ अधिकारी मिळाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!