वागदेत गोवा बनावटीची दारु वाहतूक करणाऱ्या कारचा अपघात

वागदेत गोवा बनावटीची दारु वाहतूक करणाऱ्या कारचा अपघात

*कोकण Express*

*वागदेत गोवा बनावटीची दारु वाहतूक करणाऱ्या कारचा अपघात*

*भरलेली कार काही वेळेत झाली खाली ; बापरे… पोलिसाना गाडी कोणाची ? हेच कळेना…*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली वागदे डगळवाडी गोवा ते कणकवलीच्या दिशेने गोवा बनावटीची दारु वाहतूक करणाऱ्या बलेनो कारला शुक्रवारी सायकाळी ५ वाजताच्या सुमारास झाला अपघात होताच चालक-मालक प्रसार झाले. मात्र दारूने भरलेली कार अवघ्या काही मिनिटातच खाली झाली. त्यानंतर त्या ठिकाणी कणकवली पोलीस दाखल झाले. त्यांना अद्यापही कारचा मालक सापडत नाही. त्यामुळे बापरे.. पोलिसाना गाडी कोणाची ? हेच कळेना.. अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमध्ये उमटत आहे.

या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. नेमका अपघात कसा झाला? हे समजू शकले नाही. पण गाडीचे मोठे नुकसान झाले होते, गाडीच्या दोन्ही एअर बॅग देखील ओपन झाल्या होत्या. सायकाळी आठ वाजेपर्यंत पोलिसाना ही गाडी नेमकी कोणाची? हेच समजेना कारण गाडी जवळ कोणीही आढळून आले नाही किंवा कोणी जखमी अवस्थेत दिसले नाही. कार च्या नंबर प्लेट ही चालकाने काढून टाकली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोव्यावरून कणकवलीच्या दिशेने येणाऱ्या बलेनो कारचा वागदे इगळवाडी येथे अपघात झाला. या गाडीमध्ये गोवा

बनावटीच्या दारूचे काही बॉक्स पोलिसांना सापडून जाले. चालक आणि अन्य त्याच्यासोबत असणारा साथीदार या दोघांनीही गाडी टाकून पलायन

केल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक शरद देठे, राजेश पाटील, वाहतूक पोलीस विनोद चव्हाण भेट दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!