*कोकण Express*
*समीर वंजारींच्या जिल्हाध्यक्ष निवडीला अखेर ” स्थगिती”….*
*प्रांताध्यक्षांकडून निर्णय, इर्शाद शेख यांच्याकडेच पुन्हा जिल्ह्याची धुरा ….*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेसचे नवनियुक्त प्रभारी जिल्हाध्यक्ष समीर वंजारी यांच्या निवडीला खुद्द प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी स्थगिती दिली आहे. तर पुन्हा एकदा इर्शाद शेख यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पुढील आदेश होईपर्यंत हा निर्णय असणार आहे. याबाबतचे पत्र पक्षाचे सरचिटणीस प्रमोद मोरे यांनी दिली आहे. श्री. बजारी यांची निवड झाल्यानंतर त्या ठिकाणी जिल्हा कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांना विरोध दर्शविण्यात आला होता. कोणालाही विश्वासात न घेता ही निवड करण्यात आल्याचा आरोप करून सर्व पदाधिकाऱ्यांनी सामुदायिक राजीनामे दिले होते. त्यामुळे ही निवड वादात सापडली होती. मात्र या पार्श्वभूमीवर तिसन्या दिवशी या निवडीला स्थगिती देण्यासंदर्भात खुद्द प्रांताध्यक्ष पटोले यांनी सूचना दिल्या आहेत. याबाबतचे पत्र श्री. बजारी यांच्यासह माजी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांना देण्यात आले आहे. त्यामुळे आता पक्षांतर्गत नेमक्या काय घडामोडी होतात हे पाहणे औत्सुक्यचे ठरणार आहे.