*कोकण Express*
*लाल मातीतील नव्या पिढीचा कलाकार मंदार श्यामसुंदर हडकर यांनी सादर केला अभंग…*
*”तूच सूर ठावा मजशी तूच एकतारी, सगुण रूप दावी देवा एकदातरी…*
कणकवली तालुक्यातील असलदे मधलीवाडी येथील कोकणच्या लाल मातीतील नव्या पिढीचा कलाकार मंदार श्यामसुंदर हडकर याने “तूच सूर ठावा मजशी तूच एकतारी, सगुण रूप दावी देवा एकदातरी… ” हा अभंग स्वतः हार्मोनियम वाजवत सादर केला आहे.
रंभ तूच यशकीर्तीचा जीवनी गणेशा,दुःख तिमिर दाटून येता तूच किरण आशा, तूच मूर्त मांगल्याची जपावी उरी, सगुण रूप दावी देवा एकदा तरी ||१||
लाल फुल दूर्वा शमी मी तुला प्रिय व्हावे, अष्टगंध सिंदुर बनूनि तुला मी रे पहावे, उभा जन्म झिजुदे माझा चंदनापरी ,सगुण रूप दावी देवा एकदा तरी ||२||
लहान वयात मंदार श्यामसुंदर हडकर यांच्या रूपाने असलदे गावाला एक नवा कलाकार पुढे येत आहे.त्याच्या या गायन कलेबद्दल सर्वच सरातून कौतुक होत आहे.