जन आरोग्य संघटना सिंधुदुर्ग ची वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयास सदिच्छा भेट

जन आरोग्य संघटना सिंधुदुर्ग ची वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयास सदिच्छा भेट

*कोकण Express*

*जन आरोग्य संघटना सिंधुदुर्ग ची वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयास सदिच्छा भेट*

वेंगुर्ला वार्ताहर – जन आरोग्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयाला आज सदिच्छा भेट दिली. वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.संदीप सावंत यांना जन आरोग्य संघटनेच्या सचिव सिमंतिनी मयेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
जन आरोग्य संघटनेने दिलेल्या सदिच्छा भेटीत आरोग्याच्या बाबतीत महत्वाच्या बाबींवर चर्चा करण्यात आली. उपजिल्हा रुग्णालयातील समस्याचे तसेच रिक्त पदांबाबत लवकरच सिंधुदुर्ग चे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांना भेटून निवेदन दिले जाणार असून या अडचणी लवकरात लवकर सोडविण्यासाठी मंत्रीमहोदय व वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटीविषयी चर्चा झाली.
आगामी काळात वैद्यकीय अधिकारी व स्टाफ यांच्या सुरक्षिततेसाठी जन आरोग्य संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन दिले असून उपजिल्हा रुग्णालयाला एक कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी नेमण्यासाठी पाठपुरावा ही करण्यात आलेला आहे. जन आरोग्य संघटनेच्या वतीने अध्यक्ष मकरंद परब यांनी थोडक्यात बाजू मांडून समस्यांचा निराकरणासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन वैद्यकीय अधीक्षक डॉ.संदीप पाटील यांना देण्यात आले.
भेटीदरम्यान जन आरोग्य संघटनेचे अध्यक्ष मकरंद परब, सचिव सीमंतिनी मयेकर, उपाध्यक्ष जाफर शेख, वेंगुर्ले तालुका उपाध्यक्ष यश वेंगुर्लेकर, सदस्य व जनसेवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ.संजीव लिंगवत, जिल्हा सदस्य तथा निर्भीड पोलीस टाइम्स चे संपादक सुशांत पोवार, ज्येष्ठ साहित्यिक अजित राऊळ सर, टायटस फर्नांडिस यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!