*कोकण Express*
*राष्ट्रवादी अजित पवार गटाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर..!*
कुडाळ येथे गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाची जिल्हा कार्यकारणी घोषित करण्यात आली. या कार्यकारणीची संपूर्ण माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यानापाठवण्यात आली आहे. अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक आणि कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली
राष्ट्रवादी तळागाळात वाढवणार 2014 ची राष्ट्रवादी पुन्हा दिसणार अबीदनाईक काका कुडाळकर अजितदादा पवारांचा गट हीच खरी राष्ट्रवादी एम. के. गावडे महायुतीला तडा जाऊ देणार नाही अबीद नाईक
संपर्कप्रमुख हसन मुश्रीफ सिंधुदुर्गात: पितृपक्ष संपल्यानंतर संपर्कप्रमुख हसनमुश्री सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार आहेत त्यावेळी पक्षाचा मोठा मेळावा सुद्धा होणार असल्याची माहिती यावेळी अबिद नाईक यांनी दिली.
दिवाळीत अजितदादा सिंधुदुर्ग जिल्ह्यात
राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार दिवाळीत सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार
आहेत. यावेळी महत्त्वपूर्ण बैठका घेण्यात येणार आहेत.
एम के गावडे सुरेश गवस यांची प्रांतिक साठी शिफारस
प्रज्ञा परब यांच्या गळ्यात पडणार महिला जिल्हाध्यक्ष पदाची माळ
यामध्ये जिल्हा प्रतिनिधी म्हणून असलम खातीब, अनिस नाईक, प्रशांत साटम, निशिकांत कडुलकर, अमित केतकर, सर्वेश पावसकर, सुधाकर करले, केदार खोत, शैलेश लाड, गणेश चौगुले, सचिन अडुलकर, दिनेश म्हडगुत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
तसेच जिल्हा कार्यकारिणीमध्ये
उपाध्यक्ष सुभाष सावंत, एम. डी. सावंत, सरफराज नाईक, संदीप राणे,
जिल्हा सरचिटणीस: सावळाराम अणावकर
जिल्हा सचिव धर्माजी बागकर, प्रभाकर चव्हाण, प्रसाद कुळकर्णी, राजेंद्र धारपवार, सतीश पाताडे,
विनायक जोईल, अशोक सावंत, सुशील चमणकर, आबा टाककर, पप्पू जाधव,
प्रांतिक सदस्य विलास
गावकर, दिलीप वर्णे, प्रकाश कोयंडे, सुनील भोगटे, सत्यजित धारणकर, डॉ. अभिनंदन मालंडकर,
तर कणकवली तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, देवगड रशिद खान, वैभववाडी वैभव रावराणे, मालवण नाथ मालंडकर, कुडाळ रामचंद्र सावंत, वेंगुर्ले: संदीप पेडणेकर, सावंतवाडी : उदयराव भोसले आणि मार्ग: सत्यवान गवस अशा नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तर कणकवली शहर अध्यक्षपदी
शेख आणि शहराध्यक्षपदी सूरज परब यांची नियुक्ती केली आहे.