उबाठा शिवसेना म्हणजे पवारांनी थुंकलेली सुपारी;भाजपा प्रवक्ते, आमदार नितेश राणे

उबाठा शिवसेना म्हणजे पवारांनी थुंकलेली सुपारी;भाजपा प्रवक्ते, आमदार नितेश राणे

*कोकण Express*

*उबाठा शिवसेना म्हणजे पवारांनी थुंकलेली सुपारी;भाजपा प्रवक्ते, आमदार नितेश राणे*

*अर्बन नक्षलवाद आणि संजय राऊत मध्ये साम्य,केंद्र सरकारने चौकशी करावी*

*वडील गंभीर आजारी,आजोबांची पुण्यतिथी असतानाही आदित्य परदेश दौऱ्यावर होता*

*करंटा,पुत्र, नातू कोणालाही मिळू नये,केली टीका*

*कणकवली ः प्रतिनिधी*

पवारांनी थुंकलेली सुपारी म्हणजे उबाठा शिवसेना आहे.अशी जोरदार टीका भाजपा प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांनी केली.
अर्बन नक्षल चा प्रवक्ता संजय राजाराम राऊत झाला आहे.असेच त्याचे वागणे आहे. अर्बन नक्षल आणि संजय राजाराम राऊत मध्ये साम्य आहे. जे गुण अर्बन नक्षल मध्ये असतात तेच संजय राऊत मध्ये आहेत. संजय राऊत आणि अर्बन नक्षल मध्ये संबंध काय आहेत ? याचा तपास केंद्र सरकारने करावा अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली.
सामना हे काँग्रेसचे मुखपत्र झाले आहे.काँग्रेसवर टीका केली की संजय राऊत ला मिर्ची झोंबते. आदित्य ठाकरे च्या ट्विट मुळे साधी माशीसुद्धा मरत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील दुष्काळी स्थिती बघून आपला विदेश दौरा रद्द केला. मात्र जेव्हा तुमचा मालक उद्धव ठाकरे मानेच्या ऑपरेशन साठी जसलोक मध्ये ऍडमिट असताना त्यांचा मुलगा आदित्य परदेश दौरा करत होता. वडील गंभीर आजारी असताना आदित्य स्वतः मुख्यमंत्री कसा होऊ शकतो याचा प्रस्ताव आपल्या आईच्या माध्यमातून मविआ कडे देत होता. स्व. बाळासाहेब ठाकरेंची 17 नोव्हेंबर रोजी पुण्यतिथी असतानाही आदित्य परदेश दौऱ्यात व्यस्त होता.तो समाधी स्थळी आला नाही.असा करंटा,पुत्र, नातू कोणालाही मिळू नये अशी प्रार्थना मी परमेश्वराकडे करतो असा टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला. येत्या हिवाळी अधिवेशनाआधी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार महायुती शासनात मंत्री होण्याची शक्यता असल्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपात फूट पडण्याची स्वप्ने पाहू नयेत.महिला आरक्षणाचा त्रास सर्वात जास्त संजय राऊत ला होणार.राज्याच्या राजकारणात शक्ती कपूर ची भूमिका करत संजय राऊत महिलांचे शोषण करतो. महिला आरक्षण लागू झाल्यानंतर संजय राऊत सारखे शक्ती कपूर जेलमध्ये जाणार हे ठरलेले आहे.त्यामुळे महिला आरक्षणाचा राऊत त्रास होणे साहजिक आहे. पंकजाताईंचे वक्तव्य मी ऐकले नसल्याने त्यावर मी भाष्य करणे योग्य होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!