मनसे कुडाळ-मालवण विधानसभा लढवणार

मनसे कुडाळ-मालवण विधानसभा लढवणार

*कोकण Express*

*मनसे कुडाळ-मालवण विधानसभा लढवणार…?*

*उपरकर यांनी कार्यकर्त्यांच्या घरी जात केला गणेश दर्शनाचा ‘झंझावात’*

मनसे नेते परशुराम उपरकर मालवण तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या घरी जात गणपतींचे दर्शन घेतले.गणेश दर्शनाचा ‘झंझावात’ करत दुसऱ्या व सहाव्या दिवशीही मालवण शहर, देवबाग,तारकर्ली, वायरी, पळसंब येथे गणपतींचे दर्शन घेतले. उपकर यांच्या झंझावातामुळे मनसे कुडाळ मालवण विधानसभा लढवणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत.

यावेळी त्यांच्या सोबत मनसेचे विनोद सांडव,अमित इब्रामपूरकर,विल्सन गिरकर,पास्कोल रॉड्रिग्ज,रामनाथ पराडकर,मनसे विद्यार्थी सेना मालवण तालुकाध्यक्ष संदीप लाड,उपविभाग प्रमुख ( विर्लेपार्ले ) अभिजीत मेथर,प्रणव उपरकर, लौकिक अंधारी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!