कणकवली तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत कासार्डे विद्यालयचे २६ मल्ल अव्वल..

कणकवली तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत कासार्डे विद्यालयचे २६ मल्ल अव्वल..

*कोकण Express*

*कणकवली तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत कासार्डे विद्यालयचे २६ मल्ल अव्वल..*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या मार्फत कणकवली तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले असून कासार्डे विद्यालयाच्या तब्बल २६ खेळाडूंनी विविध वयोगट व वजनी गटात अव्वल स्थान पटकावले आहे. या सर्व खेळाडुंची ओरोस येथील जिल्हा क्रीडा संकुल होणा-या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या स्पर्धेत कासार्डे विद्यालयचे एकुण ५० खेळाडू यशस्वी ठरले आहेत.
*तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेतील यशस्वी खेळाडू पुढीलप्रमाणे-*
*१४ वर्षा खालील मुलांच्या गटात -*
अमोल दीपक जाधव-(प्रथम), अस्मेश अनिरुद्ध लवेकर-( द्वितीय ),निखिल दीपक तेली-( द्वितीय ), आर्यन नारायण राणम-(प्रथम),सोहम सत्यवान पाटील-(प्रथम), सोहम दिगंबर लिंगायत-( द्वितीय ), रुक्षराज रामदास घुगे-( द्वितीय ), आदर्श मोहन राठोड -(प्रथम),विघ्नेश संतोष पेडणेकर-(प्रथम),
*१४ वर्षाखालील मुलींच्या गटात-*
धैर्या अरविंद परब -(प्रथम),बबीता चेनाराम गेलोहत-( द्वितीय ), सृष्टी दीपक राणे-(प्रथम), सना रहमान शेख-(प्रथम), रिद्धी प्रशांत राणे-( द्वितीय ), दुर्वा प्रकाश पाटील-(प्रथम), मुग्धा भरत पाताडे-(प्रथम), शिवानी महादेव जाधव-( द्वितीय ), विधी संजय चव्हाण-(प्रथम), दीक्षा बन्सीलाल सुथार -( द्वितीय ),उर्वी गुरुप्रसाद पाटील-(प्रथम), कार्तिकी सुशांत ताम्हणकर -( द्वितीय ),मृणाल संदीप सावंत-(प्रथम),
*१७ वर्षाखालील मुलांच्या गटात -*
*फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धा*
विश्वास चंदू चव्हाण-(प्रथम), सार्थक गणेश गुरव -(प्रथम),किशोर बाबूलाल देवासी -(प्रथम),आराध्य प्रवीण तळेकर-(प्रथम),तर
*ग्रीकोरोमन कुस्ती स्पर्धेत-*
दुर्वा संजय पवार-(प्रथम), व आर्यन अजय कदम -(प्रथम),हर्ष संदीप ब्रह्मदंडे-( द्वितीय )
*१७ वर्षाखालील मुलींच्या गटात-*
समीक्षा प्रदीप येंडे – (द्वितीय),भार्गवी संजय खानविलकर-(तृतीय), रिद्धी अरविंद परब-(प्रथम), साक्षी विनायक सरवणकर-
( द्वितीय )साक्षी संतोष तेली-(प्रथम), आसावरी हर्षकांत तानवडे-(प्रथम),
*१९वर्षाखालील मुलांच्या गटात -*
दीपक गोविंद जाधव – (तृतीय),प्रथमेश रामदास चव्हाण-(प्रथम),
*१९ वर्षाखालील मुलींच्या गटात-*
भक्ती महेश लाड-(प्रथम), नंदिता प्रवीण मत्तलवार-(प्रथम), राखी संजय आलव-(प्रथम),
या यशस्वी खेळाडूंना विद्यालयचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड,प्रशिक्षक अभिजित शेट्ये,आशिष जाधव,सोनू जाधव विद्यालयचे मार्गदर्शक शिक्षक सौ.विधी मुद्राळे,प्रियंका सुतार,प्रा.दिवाकर पवार,अवधुत कानकेकर,ऋषिकेश खटावकर व क्रीडा विभागातील इतर शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
या यशस्वी कुस्तीपट्टुंचे कणकवली तालुका समन्वयक बयाजी बुराण,कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष परशुराम माईणकर,सरचिटणीस रोहिदास नकाशे, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, स्कूल कमिटी चेअरमन अरविंद कुडतरकर, विद्यालयचे प्राचार्य एम.डी.खाड्ये,पर्यवेक्षक एन.सी.कुचेकर ,जेष्ठ शिक्षिका सौ बी.बी.बिसुरे, तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करुन जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!