वैभववाडीत अ.रा. विद्यालयात फ्लाईंग बर्डस् शिशु वर्गाचे उद्घाटन

*कोकण Express*

*वैभववाडीत अ.रा. विद्यालयात फ्लाईंग बर्डस् शिशु वर्गाचे उद्घाटन..*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

तालुक्यातील नावाजलेल्या वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या अर्जुन रावराणे विद्यालयाने शिक्षण क्षेत्रात आणखी एक प्रगतीचे पाऊल टाकले आहे. अ.रा.विद्यालयात आज फ्लाईंग बर्डस् शिशु वर्गाचे उद्घाटन झाले. प्राथमिक शिक्षक पतपेढी माजी चेअरमन सुनील चव्हाण यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला.

तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन प्रयोग राबविणारी संस्था म्हणून हे शैक्षणिक संकुल प्रसिद्ध आहे. कोरोनाच्या कालावधीतही या संस्थेने ज्ञानार्जनाच काम चोख बजावल होत. यावर्षी पासून संस्थेने शैक्षणिक व्याप वाढविला आहे. येथील विद्यालयात फ्लांईंग बर्डस शिशू वर्ग सुरू केले आहेत. त्याचे आज उद्घाटन झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!