*कोकण Express*
*श्रीनाईटी देवी प्रसादिक भजन मंडळ, कळसुली गवसेवाडीचा अनोखा शैक्षणिक उपक्रम*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
श्री गणेश चतुर्थी निमित्त श्री नाईटिये देवी प्रसादिक भजन मंडळ यावर्षीपासून एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे तो म्हणजे शैक्षणिक उपक्रम. दरवर्षी श्री गणेश चतुर्थी निमित्त मंडळातील सर्व सदस्यांकडे फक्त भजने केली जात होती, पण यावर्षीपासून मंडळांनी शैक्षणिक उपक्रम हाती घेऊन एक पाऊल प्रगतीकडे टाकले आहे.
श्री गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी सुरुवातीला मंडळाची नवीनच कार्यकारिणी यापूर्वी स्थापन करण्यात आली होती या नवीन कार्यकारिणीचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. सुरुवातीला मंडळाचे अध्यक्ष वैभव पारधिये, उपाध्यक्ष विनायक सावंत, सचिव एस. पी. सावंत, सहसचिव तथा सरपंच ग्रामपंचायत कळसुली सचिन पारधिये,खजिनदार दिलीप सावंत, उपखिजनदार हेमंतकुमार परब, सल्लागार शशिकांत पारधिये, सदस्य दिलीप मालवे ,सदस्य संतोष पारधिये, सदस्य रवींद्र पारधिये, सदस्य दत्तात्रय पारधिये, सदस्य विठ्ठल आर्डेकर, सदस्य सुनील मेस्त्री, सदस्य रुपेश ताम्हाणेकर, सदस्य सिताराम पारधिये या सर्वांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
तदनंतर मंडळाचा दरवर्षी श्री गणेश चतुर्थी निमित्त सर्वांकडे भजनाचा कार्यक्रम असतो पण यावर्षी एक अनोखा उपक्रम ही शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात विशेष नैपुण्य प्राप्त केल्याबद्दल सन्मान करणे या उपक्रमांतर्गत शैक्षणिक क्षेत्रात विशेष नैपुण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा यावर्षी प्रथमच खालील प्रमाणे सन्मान करण्यात आला
1) कुमार अथर्व हेमंतकुमार परब ,इयत्ता -दहावी 91%
2) कुमार शुभम प्रमोद पारधिये, इ. -बारावी ,कॉमर्स 56.17 %
3) कुमार यश गोपाळ म्हाडेश्वर ,बारावी ,विज्ञान 55.33 % 4) कुमारी आर्या लक्ष्मण परब -दहावी-77.60 %
5) कुमार सुयश सिताराम पारधिये- बारावी विज्ञान- 73.17 %
या शैक्षणिक उपक्रमाचे सर्व सर्व सदस्यांकडून खूप खूप कौतुक करण्यात आले. याही पुढे दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक उपक्रम हाती घेण्याचा मनोदय मंडळाचा आहे.