*कोकण Express*
*तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेत (मुलींच्या गटात) कासार्डे विद्यालयाचा दबदबा कायम*
*कासार्डे विद्यालयाचा 14 व 17 वर्षे खालील मुलींचा वयोगट तालुकास्तरिय कबड्डी स्पर्धेत विजेता तर 19 वर्षाखालील उपविजेता*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्गद्वारा आयोजित कणकवली तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत कासार्डे विद्यालयाच्या १४ वर्षाखालील व १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने विजेतेपद तर १९ वर्षाखालील मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकावले. तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा शेट न.म. विद्यालय खारेपाटण येथे १५ व १६ सप्टेंबर रोजी पार पडली.
कासार्डे विद्यालयाच्या १४ वर्षाखालील मुलींच्या संघात-
अक्षया झोरे, दीक्षा सुतार, ज्योती आडे, मयुरी दळवी
सेजल चव्हाण, केळाबाई जाधव, प्रगती निकम, साक्षी शेट्ये, साक्षी पटकारे, हिना शेख, दीक्षा बंदरकर, अश्विनी राठोड या खेळाडूंचा समावेश होता.
कासार्डे विद्यालयाच्या १७ वर्षाखालील मुलींच्या संघात-
नेहा पन्हाळकर, काजल राठोड, नंदीनी चव्हाण, काजल चव्हाण, पूनम राठोड, आसावरी तानवडे, अश्विनी चव्हाण, लक्ष्मी पवार, श्रुती मिसाळ, श्रेया घाडी, मयुरी रावराणे, ऐश्वर्या राठोड या खेळाडूंचा समावेश होता
कासार्डे विद्यालयाच्या १९ वर्षाखालील मुलींच्या संघात-
नेहा चव्हाण, गायत्री कोळी, पल्लवी राठोड, ममता पाटील, मोहिनी राठोड, राखी आलव, श्रावणी पांचाळ, श्रेया राणे, संजीवनी सावंत, सानिया चव्हाण, सिद्धी आईर, स्वप्नाली राठोड या खेळाडूंचा समावेश होता.
या स्पर्धेत विजेता संघाची जिल्हा क्रीडा संकुल ओरोस येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या खेळाडूंना प्रा.अनिलकुमार जमदाडे, यशवंत परब, अवधुत कानकेकर,रजनी कासार्डेकर,सविता जाधव,पूजा पाताडे,वैष्णवी डंबे, क्रीडा
शिक्षक दत्तात्रय मारकड, प्रा. दिवाकर पवार व क्रीडा विभागातील इतर शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले
यशस्वी खेळाडू तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष परशुराम माईणकर, सरचिटणीस रोहिदास नकाशे, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, शाळा समिती चेअरमन अरविंद कुडतरकर, प्राचार्य एम. डी. खाडये, पर्यवेक्षक एन.सी. कुचेकर व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पालक वर्गाने विशेष अभिनंदन केले.