इंटक विभाग अध्यक्ष अशोक राणेंसह अनेक जण भाजपामध्ये

इंटक विभाग अध्यक्ष अशोक राणेंसह अनेक जण भाजपामध्ये

*कोकण Express*

*इंटक विभाग अध्यक्ष अशोक राणेंसह अनेक जण भाजपामध्ये*

*इंटकला सिंधुर्गात मोठा धक्का*

*आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत केला भाजपमध्ये प्रवेश*

काँग्रेस प्रणित एसटी कर्मचारी इंटक संघटनेचे विभाग अध्यक्ष अशोक राणे यांच्यासह त्यांच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. जवळपास इंटक ची बहुतांशी कार्यकारिणी भाजपामध्ये गेल्याने एसटी क्षेत्रात इंटक संघटनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. प्रवेश केलेल्यांमध्ये साईनाथ ओटवकर, सचिव इंटक देवगड आगार, संदेश सुरेश साटम देवगड आगार, प्रफुल्ल तोरस्कर देवगड आगार, विनोद उन्हाळकर देवगड आगार, रोहन सुरेश शिंदे विजयदुर्ग आगार, प्रशांत गावडे कुडाळ आगार, भाऊ सावंत वेंगुर्ला उपाध्यक्ष, समीर कदम कुडाळ आगार, संतोष भाट कणकवली आगार, संजय सावंत कणकवली आगार, मनोज पवार कणकवली आगार, वैभव घाणे, विद्याधर सावंत महेश पाटील सुहास वेदरकर आदींनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. आमदार श्री राणे व जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गोट्या सावंत, तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, सरपंच संदीप मेस्त्री, प्रसन्ना उर्फ बाळू कुबल आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!