फोंडाघाट महाविद्यालयात नोकर भरती मेळावा संप्पन

फोंडाघाट महाविद्यालयात नोकर भरती मेळावा संप्पन

*कोकण Express*

*फोंडाघाट महाविद्यालयात नोकर भरती मेळावा संप्पन*

*नोकरी म्हणजे शिक्षणाला न्याय ; रंजन चिके

*फोंडाघाट ः प्रतिनिधी*

येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट मध्ये आयसीआयसीआय बँकेच्या मार्फत रिलेशनशिप मॅनेजर या पदासाठी मुलाखती संपन्न झाल्या महाविद्यालयाच्या आयक्यूएसी व स्पर्धा परीक्षा विभागामार्फत या मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी आयसीआयसीआय बँकेचे रिजनल हेड निरंजन मोहिते, क्लस्टर मॅनेजर पंकज तिळवे यांनी मुलाखती घेतल्या त्याचबरोबर रिलेशनशिप मॅनेजर छाया परब याही उपस्थित होत्या. त्याचबरोबर महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. श्री. रंजन चिके अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविकामध्ये बोलताना डॉ.आर. बी.पाटील म्हणाले की देशाची प्रगती ही बँकांच्या माध्यमातून होत असते. आयसीआयसीआय बँकचा देशात तिसरा क्रमांक लागतो आहे. अशी बँक ग्रामीण भागातील तरुणांना संधी देण्यासाठी आपल्या महाविद्यालयात आली आहे. फोंडाघाटच्या नवीन तरुणांना संधी देणे हा संस्थेचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी बोलताना श्री. पंकज तिळवे म्हणाले की ग्रामीण भागातील टॅलेंट शोधणे हे खरोखर कौशल्याचे आहे. ग्रामीण भागातील टॅलेंट काम चोख करते. त्याच्या कामात प्रामाणिकपणा असतो. परंतु बँक म्हणूनच बँकेने आपल्या धोरणात ग्रामीण भागाला प्राधान्य देण्याचे ठरवले आहेत.

कार्यक्रमाचे अध्यक्ष रंजन चिके म्हणाले की महाविद्यालयात आजच्या काळात स्पर्धा परीक्षेतून ग्रामीण भागातील मुलांना संधी मिळाली पाहिजे त्यासाठी प्रयत्न आहे. ग्रामीण भागात हुषारीला कमी नाही परंतु त्यांना संधी मिळणे आवश्यक आहे. अशी संधी देण्यासाठी आयसीआयसीआय बँकेने धाडस दाखवले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष रायबोले यांनी तर आभार डॉ. बाजीराव डाफळे यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयचा संपूर्ण कर्मचारी वर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!