*कोकण Express*
*ओ. बी. सी. प्रवर्गाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या ; शंकर पार्सेकर*
*मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे निवेदनाद्वारे मागणी*
कणकवली दि.१२(विराज गोसावी ): ओ. बी. सी. प्रवर्गात शेकडो जाती समाविष्ट आहेत. मराठा समाजाला ओ. बी. सी. मधून आरक्षण दिल्यामुळे ओ. बी. सी. समाजास त्याचा फटका बसेल. इतर राज्यामध्ये मराठा समाज अल्प प्रमाणात आहे. त्यामुळे तिथली मराठा समाजाची सामाजिक व राजकीय परिस्थिती खूप वेगळी आहे, इतर राज्याचा विचार करून मराठा समाजाला महाराष्ट्रात इतर राज्यांच्या निकष प्रमाणे ओ. बी. सी. प्रवर्गातून आरक्षण दिले गेल्यास इतर मागास प्रवर्गातील समाज बांधवांवर अन्याय होईल. प्रत्येक राज्यात मागास आयोग असून तो तेथील सामाजिक व राजकीय व आर्थिक परिस्थिती नुसार प्रत्येक जात निहायक आरक्षण ठरवत असतो. मराठा आरक्षण हे फक्त आर्थिक मागास या प्रवर्गातून दिले गेले तर त्याचा फायदा मराठा बांधवांना होईल, अन्यथा मराठा व इतर समाजात तेढ निर्माण होईल. त्यामुळे राज्य सरकारने मराठा समाजाला नवीन प्रवर्ग निर्माण करण्यासाठी आवश्यक त्या बाबी पूर्ण करून त्यांना आर्थिक आणि शैक्षणिक निकष लाऊन आरक्षण द्यावे.
ओ. बी. सी. मधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये. मुळातच मराठा समाज हा सामाजिक व राजकीयट्या खूप प्रगत आहे. मराठा समाजाला आर्थिक निकष लावून आर्थिक मागास प्रवर्गात आरक्षण द्यावे,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शंकर पार्सेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे निवेदनाद्वारे केली आहे.