*कोकण Express*
*नविन कुर्ली ग्रामपंचायत साठी स्वतंत्र मतदान केंद्र व ग्रामपंचायतीची वॉर्ड रचना करण्यात यावी*
*राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना दिले निवेदन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
नविन कुर्ली ग्रामपंचायत साठी स्वतंत्र मतदान केंद्र व ग्रामपंचायतीची वॉर्ड रचना करणेबाबात अध्यक्ष नविन कुर्ली विकास समिती तसेच राष्ट्रवादी कणकवली तालुकाध्यक्ष अनंत गंगाराम पिळणकर यांनी उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती, तसेच कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांना निवेदन सादर केले.
कणकवली तालुक्यात नविन कुर्ली ग्रामपंचायत मंजूर झालेली आहे. सदर ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र मतदान केंद्र व ग्रामपंचायतीची वॉर्ड रचना करणे आवश्यक आहे. त्यासाठी गावातील सर्व लोक व गांव प्रतिनिधी यांना प्रशासनाच्या माध्यमातून एकत्र घेऊन आपले स्तरावर वॉर्ड रचना करणेत यावी. तसेच स्वतंत्र मतदान केंद्र केल्यानंतर नविन मतदार नोंदणी करणेसाठी विशेष कार्यक्रम घेण्यात यावा अशा आशयाचे निवेदन उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती, तसेच कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांना सादर केले.