माध्यमिक विद्यामंदिर कनेडी हायस्कूल मध्ये जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे उद्घाटन

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी हायस्कूल मध्ये जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे उद्घाटन

*कोकण Express*

*माध्यमिक विद्यामंदिर कनेडी हायस्कूल मध्ये जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे उद्घाटन*

*क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आणि जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा वार बुधवार व गुरुवार दिनांक १३ व १४ सप्टेंबर २०२३ रोजी माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. या स्पर्धेत जिल्ह्यातील तालुकास्तरीय विजेता संघांनी व खेळाडूंनी सहभाग घेतला*

*सदर स्पर्धेचे उद्घाटन माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे करण्यात आले या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून सन्मा.श्री.दीक्षांत देशपांडे (तहसीलदार कणकवली, अध्यक्ष – कणकवली तालुका क्रीडा परिषद) प्रमुख उपस्थिती सन्मा.श्री. सतीशजी सावंत (अध्यक्ष- कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ,मुंबई) शालेय समिती चेअरमन सन्मा.श्री.आर.एच. सावंत, सदस्य व पदाधिकारी, सन्मा.श्री. विजय शिंदे,सन्मा. श्री.विद्या शिरस मॅडम, जिल्हा क्रीडा अधिकारी सिंधुदुर्ग, सन्मा.श्री.दिलीप पाटील महसूल विभाग कणकवली, श्री.मारुती माने, श्री.राजेश निर्गुण,श्री.अभिजीत लोंढे,श्री. संदेश तुळसनकर,श्री.मंगेश सावंत तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक व संघ व्यवस्थापक, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सन्मा. श्री. सुमंत दळवी, पर्यवेक्षक सन्मा. श्री. बयाजी बुराण (कणकवली तालुका क्रीडा समन्वयक, क्रीडा शिक्षक), प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी तसेच जिल्ह्यातील कॅरम खेळाडू ,प्रशिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते*

*या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन व आभार श्री. पी.एन.मसुरकर सर (सहा. शिक्षक माध्यमिक) यांनी केले.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!