*कोकण Express*
*शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी घेतला वैभववाडी पक्ष संघटना आढावा*
*शिवसेना पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी सक्षम बुथ लेवल एजंट नेमण्याचे दिले पदाधिकाऱ्यांना आदेश*
शिवसेना वैभववाडी तालुका बैठक आज शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे पार पडली. यावेळी बैठकीच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर वैभववाडी तालुक्याच्या वतीने जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल संदेश पारकर यांचा सत्कार करण्यात आला.*
*संदेश पारकर यांनी वैभववाडी तालुक्यातील शिवसेना पक्ष संघटनेचा आढावा घेतला. त्यांनतर उपस्थित पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या समस्या जाणुन घेवुन मार्गदर्शन केले. यावेळी तालुक्यातील शिवसेना, युवासेना, महिला संघटना रिक्त पदांचा आढावा घेवुन पदाधिकाऱ्यांना सत्क सुचना करण्यात आल्या. वैभववाडी तालुक्यातील जनतेच्या न्याय हक्कांसाठी लढत राहुन तालुक्यातील शिवसैनिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार असल्याचे आश्वासन यावेळी संदेश पारकर यांनी दिले. तसेच लवकरच तालुक्याच्या विभाग, उपविभाग आणि गावनुसार बैठका घेवुन तळागाळातील लोकांच्या समस्या जाणुन घेणार असल्याचे संदेश पारकर यांनी सांगितले.
*यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उपजिल्हाप्रमुख नंदु शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके, महिला तालुका संघटक नलिनी पाटील, युवासेना जिल्हा चिटणीस स्वप्निल धुरी, जिल्हा बँक संचालक, दिगंबर पाटील, जिल्हा परिषद सदस्या दिव्या पाचकुडे, युवासेना उपजिल्हाप्रमुख अतुल सरवटे, अल्पसंख्याक सेलचे तालुका अध्यक्ष जावेद पाटणकर, गौस पाटणकर, शहरप्रमुख शिवाजी राणे, उपतालुकाप्रमुख महेश रावराणे, श्रीराम शिंगरे, विभागप्रमुख जितेंद्र तळेकर, विठोजी पाटील, बाबा मोरे, यशवंत गवाणकर, डॉ.जाधव, खांबाळे सरपंच गणेश पवार, राजाराम मडकर, विलास पावसकर, मयूर दळवी, चंद्रकांत आमरसकर, सुनिल रावराणे, सिद्धेश. रावराणे, जयेश पवार, अरुण माळकर, नाना रावराणे, सिद्धेश शेलार, सोनाळी सरपंच भिमराव भोसले, राजेश तावडे, समाधान काडगे, सूर्यकांत परब, पांडुरंग पांचाळ, अनंत नानलोसकर, स्वप्निल रावराणे, राजा गजोबार, शंकर कोकरे, बाळू परब, शिवाजी राणे, विलास माने, यशवंत सुर्वे, बाबा तावडे, प्रमोद मोरे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.