खारेपाटण तावडे वाडी येथे भूस्खलन

खारेपाटण तावडे वाडी येथे भूस्खलन

*कोकण Express*

*खारेपाटण तावडे वाडी येथे भूस्खलन*

*डोंगर भागात राहत असलेली ६ कुटुंबासह ३३ माणसे स्थलांतरित*

खारेपाटण सरपंच सौ प्राची ईसवलकर यांसह तहसीलदार दीक्षित देशपांडे, नायब तहसीलदार श्री राठोड यांनी दिली घटनास्थळाला तातडीची भेट

कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावी येथून जवळ असलेल्या डोंगर भागात तावडे वाडी येथे आज पहाटे येथील घराच्या

बाजूला व अंगणात जमिनीला तडे व भेगा गेल्या घराच्या पाठीमागे काही प्रमाणत दरड कोसळली आहे. यामुळे येथील नागरिक

घाबरले असून घटनेची माहिती मिळताच महसूल यंत्रणेकडून कणकवली तहसीलदार दीक्षित देशपांडे, नायब तहसीलदार श्री राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात बाबत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच खारेपाटण सरपंच सौ प्राची ईस्वलकर यांनी याठीकाणी प्रथम भेट देत नागरिकांना दिलासा • दिला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री मंगेश गुरव, नडगिवे सरपंच श्री भूषण कांबळे, खरेपाटण सर्कल श्रीम एस आर बावलेकर, तलाठी के सिंगणाथ, खारेपाटण पोलीस पाटील दिगंबर भालेकर, नडगिवे पोलीस पाटील गोपाळ चव्हाण, खारेपाटण तटामुक्ती समिती अध्यक्ष सुहास राऊत यांनी देखील घटनास्थळी भेट दिली व भूस्खलनाची पाहणी केली. याबाबत अधिक वृत्त असे की, खारेपाटण तावडे वाडी येथील रहिवासी असलेले बांधव आपल्या आपल्या कुटुंबासह या डोंगर भागात गेली १४ वर्षांपासून राहत असून येथे त्यांची ५ घरे असून ६ कुटुंबासह ३३ माणसे येथे राहत आहेत परंतु काल पासून पुन्हा सुरू झालेल्या मुसळधार पावसाने येथील डोंगरी व जंगल भागात राहत असलेल्या या नागरिकांच्या घराना पहाटे तडे गेले असून काही काही प्रमाणात दरडी भाग कोसळत आहे यामुळे या घराना मोठा धोका निर्माण झाला असून भविष्यात मोठा अपघात घडण्याची दाट शक्यता आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!