*कोकण Express
*असलदे मधलीवाडी येथील जयश्री लोके यांचे निधन*
*कणकवली ः प्रतिनिधी
असलदे मधलीवाडी येथील जयश्री रामचंद्र लोके ( वय – ८५) यांचे आज दुपारी ३.३० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांचा स्वभाव मनमिळावू होता,त्यांच्या निधनाची बातमी समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.उद्या सकाळी त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
जयश्री लोके यांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यांचे उपचारा दरम्यान निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती,मुलगा,३ मुली,सूना,नातवंडे असा परिवार आहे. सेवानिवृत्त शिक्षक रामचंद्र लोके यांच्या त्या पत्नी तर सेवानिवृत्त शिक्षक अनिल लोके यांच्या त्या आई होत.