प्रवण फार्मर प्रोडयुसर कंपनी लि.वैभववाडी व रोटरी क्लब आॕफ वैभववाडी यांच्या वतीने शेतकऱ्यांसाठी ‘मातीच्या समस्या व त्यावरील उपाय’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन

प्रवण फार्मर प्रोडयुसर कंपनी लि.वैभववाडी व रोटरी क्लब आॕफ वैभववाडी यांच्या वतीने शेतकऱ्यांसाठी ‘मातीच्या समस्या व त्यावरील उपाय’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन

*कोकण Express*

*प्रवण फार्मर प्रोडयुसर कंपनी लि.वैभववाडी व रोटरी क्लब आॕफ वैभववाडी यांच्या वतीने शेतकऱ्यांसाठी ‘मातीच्या समस्या व त्यावरील उपाय’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन*

*स्वाईल फर्टीलीटी इंस्ट्युट्युट पुणे संतोष लाटणेकर करणार मार्गदर्शन*

*वैभववाडी  ः प्रतिनिधी*

प्रवण फार्मर प्रोडयुसर कंपनी लि.वैभववाडी व रोटरी क्लब आॕफ वैभववाडी यांच्या संयुक्त विदयमाने शनिवार दिनांक ९ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वा. डाॕ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन वैभववाडी येथे शेतकऱ्यांसाठी ‘मातीच्या समस्या व त्यावरील उपाय’  या विषयावर माती आरोग्य अभ्यासक, स्वाईल फर्टीलीटी इंस्ट्युट्युट पुणे संतोष लाटणेकर यांचे  व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

मातीचे आरोग्य सुधारल्यास कमी खर्चात फायदेशीर व दर्जेदार शेती करणे शक्य होते. आज सर्वञ माती चिकट व टणक झाली आहे. मातीचा सामु वाढला आहे. सेंद्रीय कर्ब कमी झाला आहे. गांडूळ दिसत नाही. त्यामुळे शेतीच्या खर्चात वाढ होत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील मातीचा अभ्यास करणे गरजेचे झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी माती अभ्यासक लाटणेकर येत आहेत. शेतकऱ्यांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा. असे आवाहन प्रवण फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष तथा प्रगतशील शेतकरी  महेश संसारे, रोटरी क्लबचे प्रेडेंट संजय रावराणे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!