सिंधुगर्जना ढोलताशा पथकाचा चतुर्थ वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा

सिंधुगर्जना ढोलताशा पथकाचा चतुर्थ वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा

*कोकण Express*

*सिंधुगर्जना ढोलताशा पथकाचा चतुर्थ वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा*

*संस्कृती संवर्धनाचे काम सिंधुगर्जना ढोलताशा पथक करत आहे असे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांचे प्रतिपादन*

एन. बी. एस. चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सिंधुगर्जना ढोल ताशा पथकाला ४ वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या चतुर्थ वर्धापनदिन सोहळ्याला प्रमुख पाहुणे कणकवलीचे तहसिलदार मा. दीक्षांत देशपांडे, देवगडचे तहसिलदार मा. आर. जे. पवार, कणकवलीचे पोलिस निरीक्षक मा.अमित यादव, गोपूरी आश्रमचे अध्यक्ष प्रा.डॉ.मुंबरकर सर उपस्थित होते. या सोहळ्यानिमित्त वाद्यपूजन करण्यात आले. १००० वाद्य अखंड वादनाचा विश्वविक्रम, रामनवमी वादनानिमित्त मध्यप्रदेश राज्य दौरा, अल्पावधीतच १२५ वादनांचा महत्वपूर्ण टप्पा, गोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट IFFI महोत्सवात हिंदी मराठी सिनेक्षेत्रातील दिग्गज कलाकारांसमोर वादन हे सर्व या वर्षात घडले याबद्दल मान्यवरांनी ढोलताशा पथकाचे विशेष कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या,यावेळी कणकवली पोलिस किरण मेहते, सौ.राजश्री रावराणे, श्री.चंद्रशेखर काणेकर, कणकवली अर्बन निधी बँक च्या संचालिका सौ.प्राची पारकर, कणकवली शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, वादकांचे पालक ,सिंधुगर्जना ढोलताशा पथकाच्या अध्यक्ष सौ. सुरेखा भिसे, संस्थापक प्रा.हरीभाऊ भिसे, कार्याध्यक्ष सर्वेश भिसे,खजिनदार शुभम पवार,पथक प्रमुख नितीन चव्हाण,उपप्रमुख प्रज्ञेश निग्रे,महिला प्रमुख रिदा मन्सूरी,महिला उपप्रमुख मिनल साबळे व इतर पदाधिकारी आणि सिंधुगर्जना पथकाचे सदस्य उपस्थित होते. हा कार्यक्रम गोपुरी आश्रम वागदे या ठिकाणी ७ सप्टेंबर सायंकाळी ५.०० वाजता आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सर्वेश भिसे यांनी केले तर आभार प्रा.हरीभाऊ भिसे यांनी मांडले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!