*कोकण Express*
*वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात दाखल बालरोग तज्ज्ञ डॉ.संदिप पाटील यांचे भाजपा च्या वतीने स्वागत*
वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात बरेच दिवस बालरोग तज्ज्ञ पद रिक्त होते , त्यामुळे गोर गरीब जनतेला त्रास सहन करावा लागत होता . त्यामुळे लवकरात लवकर बालरोग तज्ञ मिळावा म्हणून जनता मागणी करत होती . या मागणीला आता यश आले असून डॉ.संदिप पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
बालरोग तज्ञ डॉ.संदिप पाटील हे वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले असे समजतात भाजपा स्थानिक नगरसेविका सौ.श्रेया मयेकर , नगरसेवक धर्मराज कांबळी , ता.चिटनिस जयंत मोंडकर , बुथ प्रमुख रुपेश माडकर , युवा मोर्चाचे भुषण सारंग , ओबीसी सेलचे शरद मेस्त्री यांनी रुग्णालयात जाऊन डॉ.संदिप पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले . तसेच आपल्या कडून नागरिकांना चांगली सेवा मिळावी अशी इच्छा व्यक्त केली .